Ind vs Eng 3rd Test Match 2021: भारत (India) आणि इंग्लंडच्या (England) संघांदरम्यान चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (test series) तिसरा सामना 24 मार्च ते 28 मार्चदरम्यान अहमदाबादमध्ये (Ahmadabad) खेळला जाणार आहे. हा सामना दिवसरात्र होणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांचे अनेक मुख्य खेळाडू अनेक विक्रम (records) करण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू आणि कोणत्या विक्रमांच्या उंबरठ्यावर आहेत दोन्ही संघातील क्रिकेटपटू.
पाहुण्या इंग्लंडच्या संघाचा कर्णधार जो रूट जर 98 धावा काढण्यात यशस्वी झाला तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारताचा माजी फलंदाज असलेल्या वीरेंद्र सहवाग (8586) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीचा फलंदाज मॅथ्यू हेडन (8625) आणि माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कला (8653) मागे टाकेल. जो रूटने आत्तापर्यंत 101 कसोटी सामने खेळले आहेत आणि 185 खेळींमध्ये 49.97च्या सरासरीने 8546 धावा काढल्या आहेत. विराट कोहली जर या सामन्यात 96 धावा काढण्यात यशस्वी झाला तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये तो वेस्टइंडीजचा डेसमंड हेन्स, क्लाईव्ह लॉईड, ऑस्ट्रेलियाचा मार्क टेलर, पाकिस्तानचा मोहम्मद युसुफ, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि वेस्टइंडीजचा गॉर्डन ग्रीनीज यांना मागे टाकेल. सध्या त्याच्या नावावर 7463 कसोटी धावा आहेत. तसेच चेतेश्वर पुजारा यानेही 135 धावा काढल्यास तोही या क्रमवारीत पुढे सरकणार आहे. बेन स्टोक्सलाही 13 धावा काढून पुढे जाण्याची संधी आहे.
इंग्लंडचा अनुभवी जलद गोलंदाज जेम्स अँडरसन याने आणखी 9 बळी घेतल्यास तो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्यात भारताच्या अनिल कुंबळेला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर जाईल. त्याच्या नावावर सध्या 611 बळी आहेत. तर भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्माकडेही या क्रमवारीत अनेक खेळाडूंना मागे टाकत आपले स्थान उंचावण्याची संधी आहे.
भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू म्हणून इशांत शर्मा या कसोटीद्वारे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांचा विक्रम मोडेल. अजरुद्दीन यांनी भारताकडून 99 कसोटी सामने खेळले होते. गुजरातच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये सामन्यासाठी उतरताच हा विक्रम इशांत शर्माच्या नावावर नोंदवला जाईल.