Cameras in locker room : क्रीडा जगातील लज्जास्पद घटना; महिला संघाच्या लॉकर रुममध्ये आढळली छुपे कॅमेरे

Cameras in locker room :एका बड्या महिला संघाच्या लॉकर रूममध्ये दोन छुपे कॅमेरे सापडल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण जर्मनीतील एका मोठ्या हँडबॉल महिला संघाचे (Handball Women Team) आहे, ज्याच्या लॉकर रूममध्ये 2 छुपे कॅमेरे सापडले आहेत. हा कॅमेरा कोणी लावला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

 Cameras in locker room
महिला संघाच्या लॉकर रुममध्ये आढळली छुपे कॅमेरे   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बुंडेस्लिगामध्ये खेळणारा टॉप हँडबॉल संघ तुस मेट्झिंगेन क्लबच्या लॉकर रुममध्ये कॅमेरे आढळली.
  • पुराव्याच्या आधारे आरोपींचा लवकरच शोध घेण्यात येईल - संघ व्यवस्थापक
  • प्राथमिक तपासात पोलीस क्लबमधीलच एक व्यक्ती संशयित

Cameras in locker room : नवी दिल्‍ली:  एका बड्या महिला संघाच्या लॉकर रूममध्ये दोन छुपे कॅमेरे सापडल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण जर्मनीतील एका मोठ्या हँडबॉल महिला संघाचे (Handball Women Team) आहे, ज्याच्या लॉकर रूममध्ये 2 छुपे कॅमेरे सापडले आहेत. हा कॅमेरा कोणी लावला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. बुंडेस्लिगामध्ये (Bundesliga) खेळणारा टॉप हँडबॉल संघ तुस मेट्झिंगेन क्लबने (Tus Metzingen Club) गेल्या आठवड्यात कॅमेरे (Cameras) सापडल्याची तक्रार केली. (Hidden cameras found in women's teams locker room)

या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पोलीस क्लबमधीलच एका व्यक्तीला संशयित मानत आहेत. त्याचबरोबर क्लबने त्या व्यक्तीची भूमिकाही संपवली आहे. संघ व्यवस्थापक फेरेन्स रॉट सांगतात की, संघ सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांनी सांगितले की या प्रकरणात त्यांना पोलीस, संघटना आणि इतर टीमकडूनही खूप मदत मिळत आहे. रॉट म्हणाले की त्यांचा संघ पुन्हा मैदानावर खेळण्यास आणि चमत्कार करण्यास उत्सुक आहे. 
संघ पूर्णपणे एकसंध असल्याचे त्याच्या भावनेतून सिद्ध होते.

आम्ही काहीही चुकीचे होऊ देणार नाही आणि चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही असेही ते म्हणाले. पुराव्याच्या आधारे आरोपींचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र, संघासोबत घडलेल्या या घटनेने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी