हिंदूंसाठी हा ऐतिहासिक दिवस, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचे राम मंदिर भूमिपूजनावर विधान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 06, 2020 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

pakistan former cricketer: पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया यांनी राम मंदिर भूमिपूजनाचा दिवस हा जगातील समस्त हिंदू वर्गासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. 

danish kaneria
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचे राम मंदिर भूमिपूजनावर विधान 

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राम मंदिर भूमिपूजनाचा शिलान्यास केला
  • राम मंदिर भूमिपूजनाचा दिवस ऐतिहासिक
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर दानिश कनेरिया यांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई: बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(pm narendra modi) हस्ते अयोध्या नगरीत राम मंदिराचे(ram mandir bhoomi pujan) भूमिपूजन झाले. यामुळे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आनंद व्यक्त केला जात आहे. हा आनंद केवळ भारत देशापुरता मर्यादित नाही तर परदेशातही लोक आपला आनंद व्यक्त करत आहेत. इतकंच नव्हे तर भारताचा शेजारील देश पाकिस्तानातही अनेकजण यामुळे खुश आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने(danish kaneria) राम मंदिर भूमिपूजनावर आपला आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद त्याने ट्वीट करताना व्यक्त केला. ट्विटरवर त्याने न्यूयॉर्क टाईम्स स्क्वायर बिलबोर्ड वर बनवलेल्या राम मंदिराचा फोटो पोस्ट केला आहे. 

ट्वीटमध्ये दानिश कनेरियाने लिहिले की आज जगभरातील हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस आहे. यासोबतच त्याने पुढे लिहिले की भगवान राम आमचे आदर्श आहे. आणखी एका ट्वीटमध्ये त्याने श्री राम असे लिहिताना भगवान राम यांचा फोटो ट्वीट केला मात्र काही वेळानंतर त्याने तो हटवला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला शिलान्यास

अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजनानंतर शिलान्यास केला. आता मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह १७५ जण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. पंतप्रधान मोदींनी अभिजीत मुहूर्तावर मंदिराचा शिलान्यास केला. 

राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. राम सर्वांच्या मनात आहे त्यामुळे कोणतेही काम करायचे असेल तर आपण भगवान राम यांच्याकडे प्रेरणेने पाहतो. भगवान राम यांच्याकडे अद्भुत शक्ती आहे. इमारती उद्ध्वस्त झाल्या. तसेच अस्तित्व मिटवण्याचेही प्रयत् झाले. मात्र अद्यापही राम आपल्या संस्कृतीचा आधार आहे. श्री राम मंदिर आपल्या आधुनिक संस्कृतीचे प्रतीक असेल. राष्ट्रीय भावनेचे प्रतीक असेल. या मंदिराच्या निर्मितीमुळे केवळ अयोध्येची भव्यता वाढणार नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाही बदलणार आहे. असे मोदी यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी