मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे(india vs zimbabwe) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेती पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना १८ ऑगस्टला खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने(team india) १० विकेटनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात राष्ट्रगीतादरम्यान टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनसोबत जे घडले ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Honey bee attacked on ishan kishan during national anthem
अधिक वाचा - सपना चौधरीच्या ठुमक्यांवर थिरकत बीडमध्ये दहीहंडी
सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघ राष्ट्रगीतासाठी पोहोचला होता. या दरम्यान मधमाशीने इशान किशनवर हल्ला केला. यानंतर त्याची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मधमाशी इशान किशनच्या मानेजवळ बसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र इशान किशन तिच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, तो जागेवरचा हलला नाही. यावर चाहते जबरदस्त मजा घेत आहेत. सोशल मीडियावर विविध प्रकारचे कमेंट येत आहेत. इशान किशन पहिल्या वनडेत टीम इंडियाचा भाग होता मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही..
Ishan Kishan during National Anthem, got annoyed by a Bee.#INDvZIM pic.twitter.com/e1RNct2xj1 — Shubham🇮🇳 (@LoyalCTFan) August 18, 2022
या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलनेही राष्ट्रगीतादरम्यान असे काही केले की ज्यामुळे चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर चाहते त्याचे जबरदस्त कौतुक करत आहेत. राष्ट्रगीत सुरू होण्याआधी केएल राहुल च्युईंगम खाताना दिसला. केएल राहुलने राष्ट्रगीत सुरू होण्याआधी च्युईंगम काढून फेकून दिला. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भारतीय युझरने म्हटलेकी आम्हाला राहुलवर गर्व आहे.
KL Rahul took out the Chewing Gum from his Mouth before National Anthem 🇮🇳❤️ — 𝐌𝐢𝐆𝐇𝐓𝐘 (@AryanMane45) August 18, 2022
Proud of You @klrahul ❤️🔥#INDvsZIM | #CricketTwitter pic.twitter.com/erBYx16auA
अधिक वाचा - घरात आर्थिक संकट असेल तर या दिवशी करा 'हे' उपाय
तब्बल ६ वर्षांनी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करत विजय मिळवला. भारताने या सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या झिम्बाब्वेला ५० षटकांत केवळ १८९ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे हे माफक आव्हान पूर्ण करणे भारताला सहज शक्य झाले.