Asia Cup 2022 : ज्यांना झोडपलं त्यांनीच कोहलीला दिलं emotional गिफ्ट; हाँगकाँग टीमचा मेसेज वाचून पाणावतील डोळे

आशिया कपमधील (Asia Cup) दुसरा सामना भारताने (India) 40 धावांनी जिंकला. हाँगकाँगच्या (Hong Kong) संघाल पराभूत करत भारताने सूपर 4 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. हाँगकाँगविरुद्धच्या या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) जोरदार खेळी केली. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी करताना आपापली अर्धशतके झळकावली.

Hong Kong gave emotional gift to Kohli
हाँगकाँगच्या संघाने सामना हरला, जिंकलं हिंदुस्तानी दिल   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • कोहलीने आपल्या टी-20 कारकिर्दीतील आपले 31 वे अर्धशतक पूर्ण केले.
  • विराटला हाँगकाँगच्या संघाकडू एक खास गिफ्ट मिळाले.
  • हॉंगकॉंग संघाकडून मिळालेल्या या गिफ्टबद्दल विराटनेही आनंद व्यक्त केला आहे.

दुबई: आशिया कपमधील (Asia Cup) दुसरा सामना भारताने (India) 40 धावांनी जिंकला. हाँगकाँगच्या (Hong Kong) संघाल पराभूत करत भारताने सूपर 4 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. हाँगकाँगविरुद्धच्या या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) जोरदार खेळी केली. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी करताना आपापली अर्धशतके झळकावली. हाँगकाँगच्या गोलंदाजांना जोरदार तुडवलं. त्याच संघाने विराट कोहलीला एक खास गिफ्ट दिलं. या गिफ्टवरील संदेश वाचून तुमचे डोळेही भरून येतील. 

आशिया कपमधील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि त्यानेही यावेळेस चाहत्यांना निराश केले नाही. विराट या सामन्यात पूर्णपणे लयीत दिसला. कोहलीने आपल्या टी-20 कारकिर्दीतील आपले 31 वे अर्धशतक पूर्ण केले. याच सामन्यात विराटला हाँगकाँगच्या संघाकडू एक खास गिफ्ट देखील मिळाले.

Read Also : गोष्टी विसरायला होतय? मग तुम्हीपण डिमेंशिया बळी आहात का?

हॉंगकॉंगचा संघ आहे विराटचा चाहता

विराटचे जगभरात चाहते आहेतच पण विरोधी संघातही या भारतीय दिग्गज खेळाडूचे कौतुक केले जाते. हाँगकाँग देखील असाच एक संघ आहे ज्यावर विराटचा खूप प्रभाव आहे. बुधवारच्या सामन्यानंतर या संघाने विराटवरील आपले प्रेम एका छानशा गिफ्टच्या रूपातून दाखवले. चौथ्यांदा आशिया कप खेळणाऱ्या हाँगकाँगच्या संघाने विराटला आपल्या संघाची जर्सी भेट दिली.

जर्सीवर खास संदेश

जर्सीसोबतच टीमने विराटसाठी खास संदेशही लिहिला आहे. त्यात लिहिले होते, “विराट, पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्यासोबत आहोत! पुढे अनेक अविश्वसनीय, चांगले दिवस आहेत. खूप प्रेम आणि ताकदीसह, हाँगकाँग टीम."

Read Also : नवसाला पावतो नाशकातील तिळ-तिळ वाढणारा गणपती बाप्पा

विराटने मानले अभार

हॉंगकॉंग संघाकडून मिळालेल्या या गिफ्टबद्दल विराटनेही आनंद व्यक्त केला आणि आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. जर्सीचा फोटो शेअर करत विराटने लिहिले, "धन्यवाद हाँगकाँग टिम. हे खरोखरच विनम्र आणि खूप सुंदर आहे."
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी