World Cup पाकिस्तानची सेमी फायनलसाठी झाली पूर्ण कोंडी, टॉस जिंकणे गरजेचे, जाणून घ्या पूर्ण गणित 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 04, 2019 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करून पाकिस्तानच्या वर्ल्ड कप २०१९ च्या सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या शक्यता जवळपास संपवल्या आहे. पण तरीही एका प्रकारे पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. 

pakistan crickt team
पाकिस्तान क्रिकेट टीम  |  फोटो सौजन्य: AP

चेस्ट्रर ली स्ट्रीट :  इंग्लंडने न्यूझीलंडला ११९ धावांनी पराभूत करत वर्ल्ड कप २०१९ च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंड ही ऑस्ट्रेलिया आणि भारतनंतर सेमीफायनलमध्ये पोहचणारी तिसरी टीम आहे. तसेच इंग्लंडशी पराभूत होऊनही न्यूझीलंडने सेमी फायनलचे तिकीट मिळवले आहे. पाकिस्तानचा उद्या बांग्लादेशशी सामना होणार आहे. पण तो सामना फार मोठ्या फरकाने जिंकला तर पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश शक्य होऊ शकतो. पण असे करणे जवळपास अशक्य आहे. 

पाकिस्तानचा अखेरचा सामना ५ जूनला बांग्लादेशसोबत आहे. या सामन्यात पाकिस्तानला खूप मोठ्या मार्जिनने विजय मिळवावा लागणार आहे. फॉर्ममध्ये असलेल्या बांग्लादेशविरूद्ध अशी कामगिरी करणे पाकिस्तानसाठी जवळपास अशक्य वाटत आहे. क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे, त्यामुळे चला जाणून घेऊ या पाकिस्तान कशा पद्धतीने सेमी फायनलमध्ये पोहचू शकतो. 

पाकिस्तानला सर्वात प्रथम बांग्लादेश विरूद्ध कोणत्याही परिस्थितीत पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे. असे करून त्यांनी ४०० धावा कराव्या लागणार आहे. ४०० धावा करूनही त्यांना थांबून चालणार नाही. त्यांना गोलंदाजी करताना बांग्लादेशला ८४ धावांमध्ये गारद करावे लागणार आहे. हे अंतर ३१६ धावांचे असले पाहिजे. तेस पाकिस्तानने ३५० धावा केल्या तर बांग्लादेशला ३१२ धावांनी पराभूत करावे लागणार आहे. असे करणे जवळपास अशक्य दिसते आहे. 

तर दुसरीकडे दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर त्यांची सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ५ जून रोजी बांग्लादेशचा संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तान आपोआप वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल. त्यामुळे असे झाले तर टॉसच्या माध्यमातून बाहेर झालेली पाकिस्तान ही वर्ल्ड कपच्या इतिहासातील पहिली टीम ठरू शकते. 

हे आहे पाकिस्तानसाठीचे समिकरण 

  1. ३०८ धावा बनवल्या तर ३०८ धावांनी पराभूत करावे लागेल

  2. ३५० धावा केल्या तर ३१२ धावांनी पराभूत करावे लागेल 

  3. ४०० धावा केल्या तर बांग्लादेशला ३१६ धावांनी पराभूत करावे लागेल

  4. ४५० धावा केल्या तर ३२१ धावांनी पराभूत करावे लागेल 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup पाकिस्तानची सेमी फायनलसाठी झाली पूर्ण कोंडी, टॉस जिंकणे गरजेचे, जाणून घ्या पूर्ण गणित  Description: इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करून पाकिस्तानच्या वर्ल्ड कप २०१९ च्या सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या शक्यता जवळपास संपवल्या आहे. पण तरीही एका प्रकारे पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola