T20 World Cup:चॅम्पियन इंग्लंड संघावर पैशांचा पाऊस, टीम इंडियाला किती मिळाले पैसे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 14, 2022 | 12:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

ENG vs PAK: टी20 वर्ल्ड कप 2022च्या चॅम्पियन इंग्लंड संघाला बक्षीस म्हणून कोट्यवधी रूपये मिळाले आहेत. उपविजेता संघ पाकिस्तानवरही पैशांचा पाऊस झाला आहे. इतकंच नव्हे तर सेमीफायनलमध्ये हरल्यानंतरही टीम इंडियाला बंपर बक्षीस मिळाले आहे. 

england team
इंग्लंडवर पैशांचा पाऊस, टीम इंडियाला किती मिळाले पैसे 
थोडं पण कामाचं
  • टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघावर पैशांचा पाऊस पडला.
  • विजेता संघ इंग्लंडला बक्षीस म्हणून 16 लाख डॉलर  (12.88 कोटी रुपये) मिळाले.
  • उपविजेता संघ पाकिस्तान संघाला चांगली रक्कम मिळाले.

मुंबई: इंग्लंडने(england) टी20 वर्ल्ड कप 2022 चा(t-20 world cup 2022)  खिताब जिंकला आहे. मेलबर्नमध्ये() खेळवल्या गेलेल्या फायनल सामन्यात इंग्लिश संघाने पाकिस्तानला पाच विकेटनी हरवले. पाकिस्तानने(pakistan) इंग्लंडला विजयासाठी 138  धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बटलर ब्रिगेडने सहा चेंडू राखत पूर्ण केले. इंग्लंडचा() संघ दुसऱ्या टी20 चॅम्पियन(t-20 champion) बनला. How much money got to world cup winner and others team

अधिक वाचा - गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या

टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघावर पैशांचा पाऊस पडला. विजेता संघ इंग्लंडला बक्षीस म्हणून 16 लाख डॉलर  (12.88 कोटी रुपये) मिळाले. उपविजेता संघ पाकिस्तान संघाला चांगली रक्कम मिळाले. पाकिस्तानला रनर अप म्हणून  8 लाख डॉलर (6.44 कोटी रुपये )मिळाले. याशिवाय दोन्ही संघांना सुपर 12 स्टेजमध्ये सामील सामने खेळण्यासाठीही रक्कम मिळाली. 

आयसीसीने दिले  45 कोटीपेक्षा जास्त रूपये

आयसीसीने  टी20 वर्ल्डकपच्या सुरूवातीलाच बक्षीसाच्या रकमेची घोषणा केली होती.  टी20 वर्ल्डकपसाठी एकूण 5.6 मिलियन डॉलर (45.14 कोटी रुपये) इतकी रक्कम ठरवण्यात आली होती. ही रक्कम 16 संघांमध्ये विभागली जाणार आहे. यानुसार टी20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला 1. 6 मिलियन डॉलर, उपविजेत्या संघाला 0.8 मिलियन डॉलर तर सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या दोन संघाला प्रत्येकी 4 लाख डॉलर दिले गेले. 

सुपर 12 स्टेजमध्ये एकूण 12 पैकी 4 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. ते 8 संघ जे सुपर 12 स्टेजमधून बाहेर झाले. त्यांनाही आयसीसीकडून बक्षीस दिले गेले. या संघांना 70 हजार डॉलर दिले गेले तर गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये ही रक्कम 40 हजार डॉलर होती. जे चार संघ क्वालिफाईंग राऊंडमध्येच बाहेर झाले त्यांना 40 हजार डॉलर दिले जाणार होते. तर पहिल्यां राऊंडमधील विजेत्यांसाठीही 40 हजार डॉलर  ठेवण्यात आले होते. 

भारतीय संघाला मिळाले इतके पैसे

सेमीफायनलमधील सामना हरल्यानंतरही टीम इंडियाला बंपर पैसे मिळाले आहेत. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी 4 लाख डॉलर मिळाले. सोबतच सुपर 12 स्टेजमध्ये टीम इंडियाने पाच पैकी 4 सामन्यांत विजय मिळवला होता त्यामुळे त्याचे त्यांना एक लाख साठ हजार डॉलर मिळाले. म्हणजेच भारताला टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण मिळून 4.51 करोड़ रुपये (560000 डॉलर) इतके बक्षीस मिळाले. 

अधिक वाचा - तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट

टी-20 वर्ल्डकपमधील बक्षीस(भारतीय रुपयांमध्ये)

वर्ल्ड कप विजेता: साधारण 13 कोटी रुपये (इंग्लंड)
वर्ल्ड कप उप-विजेता: 6.44 कोटी रुपये (पाकिस्तान)
सेमीफायनलिस्ट: 3.22 कोटी रुपये (भारत, न्यूझीलंड)
सुपर-12 मधील प्रत्येक विजय: 32 लाख रुपये
सुपर-12मधून बाहेर होणारे संघ: 56.43 लाख रुपये
पहिल्या राऊंडमध्ये विजयी: 32 लाख रुपये
पहिल्या राऊंडमधून बाहेर झाल्यावर: 32 लाख रुपये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी