Rohit-virat salary: वनडे-टी२० कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळणार?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 10, 2021 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

rohit sharma, virat kohli salary: विराट कोहली (Virat Kohli) आता वनडे आणि टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. कोहित, रोहित आणि जसप्रीम बुमराह क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ग्रेड ए+मध्ये आहेत. 

rohit-virat
वनडे,टी२० कर्णधार रोहितला विराटपेक्षा जास्त पगार मिळणार? 
थोडं पण कामाचं
  • रोहितच्या कर्णधार बनल्यानंतर आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहेत की विराट कोहलीपेक्षा आता रोहितला जास्त पगार मिळणार का?
  • विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ग्रेड ए+मध्ये आहेत
  • ए+खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रूपये दिले जातात.

मुंबई: रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या खांद्यावर आता भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) पुढे नेण्याची जबाबदारी आहे. मुंबईचाहा स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा वनडे आणि टी-२० कर्णधार बनला आहे. रोहितने विराट कोहलीची(Virat Kohli) जागा घेतली आहे. विराट कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करत राहणार आहे. रोहितला कसोटी संघाचा उप कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहितच्या कर्णधार बनल्यानंतर आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहेत की विराट कोहलीपेक्षा आता रोहितला जास्त पगार मिळणार का? जाणून घेऊया की भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) रोहित आणि विराटला वर्षाला किती पगार देते. How much salary get rohit sharma after became captain of one day and t-20 team

किती मिळतो या खेळाडूंना पगार

विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ग्रेड ए+मध्ये आहेत. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टनुसार ए+खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रूपये दिले जातात. बीसीसीआय कर्णधारपदासाठी वेगळी सॅलरी देत नाही. या पद्धतीने ग्रेड  A, B, Cच्या खेळाडूंना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि एक कोटी रूपये दिले जातात. 

आयपीएल २०२२मध्ये कोहलीपेक्षा जास्त कमावणार रोहित

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुढील वर्षी आयपीएलमध्ये १५ ऐवजी १६ कोटी मिळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोहलीला १५ कोटींना रिटेन केले. कोहलीच्या सॅलरीमध्ये २ कोटींची कपात करण्यात आली आहे. आधी त्याला १७ कोटी मिळत होते. 

आयपीएलमध्ये विराटपेक्षा रोहितची कमाई जास्त

रोहित शर्मा (Rohit Shamra Salary) च्या आयपीएल कमाईबाबत बोलायचे झाल्यास त्याने या लीगमधून आतापर्यंत १४६.६ कोटी रूपये कमावले आहेत. रोहित शर्मा आयपीएलमध्ये एमएस धोनीनंतर सर्वाधिक पैसे कमावणारा खेळाड आहे. धोनी आयपीएलमधून १५० कोटींपेक्षा अधिक कमावणारा एकमेव क्रिकेटर आहे. कोहलीने आयपीएलमधून आतापर्यं १४३ कोटी कमावलेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी