T20 World Cup 2022:T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या पाकच्या आशा जिवंत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 28, 2022 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pakistan Team: पाकिस्तानी संघाला टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध सलग दोन पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र आताही पाकिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करू शकतो. 

pakistani
T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये असा पोहोचू शकतो पाकिस्तान 
थोडं पण कामाचं
  • ग्रुप 2मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध धमाकेदार विजय मिळवला.
  • द. आफ्रिकेविरुद्धचा एक सामना रद्द झाला आणि एका सामन्यात विजय मिळाला.
  • यासाठी आफ्रिका संघाचे तीन गुण आहेत आणि झिम्बाब्वेचेही तीन गुण आहेत.

मुंबई: पाकिस्तानी संघासाठी(Pakistani) टी20 वर्ल्ड कप 2022मधील(T20 World Cup) आतापर्यंतचा प्रवास एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. पाकिस्तानच्या संघाला भारत(india) आणि झिम्बाब्वेकडून(zimbawbe) मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. आतापर्यंत कमकुवत मानला जाणारा झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानला एका धावेने हरवले. मात्र टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये सलग दोन पराभवानंतरही पाकिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करू शकतो. How to pakistan reach in semifinal after two defeat in world cup

अधिक वाचा - फक्त दहा हजारांमध्ये केंद्र सरकारसोबत पार्टनरशीप

ग्रुप 2ची ही स्थिी

ग्रुप 2मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध धमाकेदार विजय मिळवला. तर द. आफ्रिकेविरुद्धचा एक सामना रद्द झाला आणि एका सामन्यात विजय मिळाला. यासाठी आफ्रिका संघाचे तीन गुण आहेत आणि झिम्बाब्वेचेही तीन गुण आहेत. आता या समीकरणाच्या हिशेबाने भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जाणे नक्की आहे. तर झिम्बाब्वे आणि द. आफ्रिकेतील एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो. 

पाकिस्तानला नशिबाची मिळणार साथ?

पाकिस्तानला टी20 वर्ल्ड कपमध्ये सुरूवातीच्या दोनही सामन्यात पराभव पत्करावा लागला. अशातच त्यांना सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आपले उरलेले तीनही सामने जिंकणे महत्त्वाचे असतील. पाकिस्तानला आता द. आफ्रिका, नेदरलँड्स आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत. हे सामने पाकिस्तानने मोठ्या अंतराने जिंकल्यास त्यांचे 6 गुण होतील. याशिवाय त्यांना अशी प्रार्थना करावी लागेल की द. आफ्रिका आणि झिम्बाब्वेला 2-2 सामन्यात पराभव मिळावा. 

अधिक वाचा - हॉटेलमध्ये का वापरतात पांढरं बेडशीट?

पाकिस्तानने एकदा जिंकलाय वर्ल्डकप

पाकिस्तानी संघाने 2009 मध्ये टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला होता. तेव्हापासून संघाने हा खिताब जिंकलेला नाही. तर गेल्या वर्षी पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. मात्र सेमीफायनलमध्ये त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता सध्याच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी संघाने खूपच खराब कामगिरी केली. अशातच कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वावर सवाल केले जात आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी