Happy Birthday Sakshi Malik: फिटनेससाठी साक्षी मलिक असे घेते डाएट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 03, 2022 | 16:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

ऑलिम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिकचा जन्म ३ सप्टेंबर १९९२ला हरयाणाच्या रोहतकमध्ये झाला होता. साक्षीच्या वडिलांचे नाव सुखबीर मलिक आणि आईचे नाव सुदेश मलिक आहे. वडील बस कंडक्टर आणि आई आंगणवाडी कार्यकर्ती आहे. साक्षी खेळासह आपले आरोग्य आणि फिटनेसवर पूर्ण लक्ष देते. 

sakshi malik
फिटनेससाठी साक्षी मलिक असे घेते डाएट 
थोडं पण कामाचं
  • फिटनेससाठी साक्षी मलिक असे घेते डाएट
  • साक्षीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
  • साक्षी खेळासह आपले आरोग्य आणि फिटनेसवर पूर्ण लक्ष देते.

मुंबई: भारतातील प्रसिद्ध महिला फ्रीस्टाईल कुस्तीपटू साक्षी मलिका(freestyle restler sakshii malik) आज आपला वाढदिवस(birthday) साजरा करत आहे. या निमित्त देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. हे वर्ष तिच्यासाठी खूप खास राहिले आहे. या वर्षी बर्मिंगहम येथे आयोजित कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये ६२ वर्षीय महिला फ्री स्टाईल कुस्तीपटू साक्षीने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता.How to sakshi malik fir herself, know all about her

अधिक वाचा - 200 कोटी वसुली प्रकरणात नोरा फतेहीची 6 तास चौकशी

याआधी तिने रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये कांस्यपदक जिंकत देशाचे नाव रोशन केले होते. २०१४मधील कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने सिल्व्हर मेडल मिळवले होते. जागतिक पटलावर फ्री स्टाईल रेसलिंगमध्ये शानदार कामगिरासाठी साक्षीला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय २०१७मध्ये साक्षीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साक्षीचा जन्म ३ सप्टेंबर १९९२मध्ये हरयाणाच्या रोहतकमध्ये झाला होता. 

साक्षी खेळासह आपले आरोोग्य आणि फिटनेसवर पूर्ण लक्ष देते. यासाठी ती संतुलित डाएट घेते. ती दररोज अनेक तास वर्कआऊट करते. 

साक्षीने नुकतेच तिच्या फिटनेस वर्कआऊटबद्दल सांगितले होते. तिने सांगितले की ती दोन वेळा सराव करते. पहिले सेशन सकाळी असते. तर दुसरे सेशन संध्याकाळी असते. ती सगळ्यात आधी योगा करते. त्यानंतर ट्रेनिंग. संध्याकाळी पुन्हा ट्रेनिंग. बाकी दिवस आराम. 

सरावादरम्यान वर्कआऊट असते. यात हाय इंटेसिटी एक्सरसाईज करावे लागते. आठवड्याला १२ पद्धतीने ट्रेनिंग सेशन असते. सामन्याच्याआधी अतिरिक्त ट्रेनिंग सेशन असतात. रविवारी आराम असतो. 

डाएटबाबत साक्षीने सांगितले की ती कोणतेही स्पेशल डाएट फॉलो करत नाही. तिला आपल्या आवडीच्या गोष्टी खायला आवडतात. जर सामना असेल तर त्या दिवसांमध्ये ती साखर आणि तूप खाणे बंद करते. फिट राहण्यासाठी साक्षी सलाड आणि उकडलेल्या भाज्या खाते. यात फायबर आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. 

अधिक वाचा - 'गौराई पूजनानिमित्त मराठी शुभेच्छा, Images-WhatsApp Status

साक्षीच्या डाएटमध्ये बदल होत असतो. जेव्हा एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो तेव्हा वजन नियंत्रणात राहणे गरजेचे असते. या दिवसांत ती सलाड तसेच भाज्या खाते. तर जेव्हा सामने नसतील तेव्हा साक्षी घरी दूध, दही, तूप आणि आईच्या हाताच्या जेवणाचा आस्वाद घेते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी