IND vs ENG LIVE Cricket Score Streaming Online: मोबाईलवर असा जाणून घ्या भारत वि इंग्लंड सामन्याचा लाईव्ह स्कोर, ही आहे पूर्ण पद्धत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2022 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs ENG: जर तुम्ही क्रिकेटचे शौकीन आहात  आणि भारताचा एकही सामना मिस करू इच्छित नाही तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की भारत वि इंग्लंड लाईव्ह स्कोर जाणून घेण्याची पद्धत. 

india vs england
मोबाईलवर असा जाणून घ्या भारत वि इंग्लंड सामन्याचा Live score 
थोडं पण कामाचं
 • भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना गुरूवारी 10 नोव्हेंबरला म्हणजेच आज होत आहे.
 • हा सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हलमध्ये होणार आहे
 • याचे प्रसारण दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होणार आहे.

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022च्या(t-20 world cup 2022) सेमीफायनल(semifinal) सामन्यात टीम इंडियाचा(team india) सामना इंग्लंड संघाशी() होत आहे. टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना गुरूवारी 10 नोव्हेंबरला म्हणजेच आज होत आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हलमध्ये होणार आहे आणि याचे प्रसारण दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होणार आहे. जर तुम्ही क्रिकेटचे शौकीन असाल आणि भारताचा एकही सामना तुम्हाला मिस करायचा नसेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आज सामना घरबसल्या तुम्ही ऑनलाईन कसा पाहू शकता.  तसेच आपल्या मोबाईलवर लाईव्ह स्कोर जाणून घेण्याची पद्धत...How to watch IND vs ENG LIVE Cricket Score Streaming Online

अधिक वाचा - वयाच्या 40-50 व्या वर्षी फास्टिंग शुगर ठेवा नियंत्रणात...

ओटीटीवर असा पाहा लाईव्ह सामना

या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर दिसेल. मात्र त्यासाठी तुम्हाला टीव्हीसमोर बसावे लागेल. यापेक्षा चांगले की तुम्ही ओटीटीवर डिस्ने प्लस हॉटस्टार डाऊनलोड करून सामन्याचा आनंद उचलू शकता. टी20 वर्ल्डकप सामन्यांचे प्रसारण डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. ओटीटीवर सामना पाहण्यासाठी फॉलो करा या टिप्स...

 1. सगळ्यात आधी आपल्या फोनमध्ये Disney plus app इन्स्टॉल करा. 
 2. त्यानंतर Disney+ Hotstar  सबस्क्रिप्शन घ्या. 
 3. सबस्क्रिप्शन घेतल्यानतंर लॉग इन करा. 
 4. यानंतर तुमच्या अॅपमध्ये टी20 वर्ल्ड कपचे आयकॉन दिसेल. 
 5. यावर क्लिक करून तुम्ही लाईव्ह सामन्याच्या आनंद घेऊ शकता.

तुम्ही Disney+ Hotstar Premium सबस्क्रिप्शन 299 रूपये दर महिना आणि 1499 प्रती वार्षिक करू शकता. यात तुम्हाला विविध सिनेमा, शोज, स्पोर्ट्स आणि बरचं काही समाविष्ट असतं. तसेच तुम्हील Disney+ Hotstarचे सुपर सबस्क्रिप्शन 899 रूपयांना प्रती वार्षिक मिळवू शकता. यात तुम्ही क्रिकेट लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. 

अधिक वाचा - संजय राऊत थेट घेणार फडणवीसांची भेट, जाणून घ्या कारण

मोबाईलवर असा जाणून घ्या लाईव्ह स्कोर  

 1. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये Cricbuzz या CricinfoCricbuzz अथव Cricinfo सारखे अॅप डाऊनलोड करावे लागेल. 
 2. यानंतर अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. 
 3. यानंतर सर्व लाईव्ह सामन्याचे डिटेल्स दिसतील. 
 4. तुम्हाला येथे भारत वि इंग्लंड पर्याय निवडावा लागेल. 
 5. यानंतर तुम्हाला या सामन्याचा लाईव्ह स्कोर दिसू लागेल. 

Disney+ Hotstar Jio​ ऑफर

Reliance jioने फ्री Disney+ Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन दिले आहे. यातच तुम्ही जर जिओ फायबर वापरत आहात तर तुम्हाला Disney+ Hotstar अॅक्सेस मिळू शकतो. यासाठीच्या प्लानची किंमत  1,499 आणि 4,199 रूपये इतकी आहे. 

Disney+ Hotstar Airtel ऑफर

जर तुम्ही Airtel युझर असाल तर Disney+ Hotstar फ्रीमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान 181, 399,  499, 599, 839,  2,999 आणि 3,359 रूपयांच्या रिचार्जवर तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन एका वर्षांपर्यंत फ्री आहे. 

Disney+ Hotstar Vi ऑफर

Viच्या युझर्ससाठी Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन फ्री आहे. यासाठी तुम्ही 151,  399,  499, 601, 901, 1066 आणि 3099 रूपयांचे प्लान तुम्ही पाहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी