मुंबई: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर(pakistan former cricketer shoaib akhtar) जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजीसमोर(bowling) खेळणे हे प्रत्येक फलंदाजासाठी आव्हान असायचे. त्याच्या बॉलवर अनेकदा धाकड फलंदाजही दुखापतग्रस्तझालेत. खरंतर या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्यात. मात्र आताची गोष्ट आहे ती क्रिकेट चाहत्यांना हैराण करू शकते. द रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएबचे म्हणणे आहे की त्याला फलंदाजाच्या डोक्यावर बॉल मारायचा होता.
अधिक वाचा - कधी आहे जूनमध्ये निर्जला एकादशीचा उपवास?
आपल्या घातक बाऊन्सरसाठी कुख्यात शोएबच साधारण प्रत्येक बॉल १५० किमीत प्रति तासाने टाकत असे. या वेगाने आलेला बॉल खेळणे हे प्रत्येक फलंदाजासाठी सोपे नसते. अख्तरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान बॉल टाकण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने २००३मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या वर्ल्डकपमध्ये १६१.३ किमी प्रति तासाने बॉल टाकला होता.
अख्तरने म्हणाला, मला शॉटमध्ये बॉलला हिट करणे पसंत आहे कारण यामुळे फलंदाज क्रीझवर उड्या मारत असे. त्याने एका मुलाखतीत सांगितले, मी बाऊन्सर फेकले, कारण फलंदाजांना माकडासारखे उडया मारताना पाहणे मला आवडाये. खोटं बोलंत नाहीये. मला फलंदाजांच्या डोक्यावर मारायचे होते कारण माझ्याकडे वेग होता. हे एक वेगवान गोलंदाज असल्याचा फायदा आहे.
अख्तरने सांगितले की त्याला फलंदाजाच्या शरीावर प्रहाकर करायचा होता ज्यामुळे तो कधीही आरशात पाहिले तेव्हा त्याला शोएबची आठवण येईल. केस उडतायत आणि हृदयाचे ठोके हळू होत असतील तर तुम्ही निश्चितपणे फुलर गोलंदाजी करत नाही आहात. शरीरावर मारा झाला पाहिजे. ज्यामुळे शरीरावर सूज येईल. जेव्हा गोलंदाज स्वत:ला आरशात पाहील तेव्हा त्याला माझी आठवण येईल.
अधिक वाचा - दृष्टीभ्रम निर्माण करणारे चित्र, २ टक्के माणसं फरक ओळखू शकली
अख्तरने ४६ कसोटींमध्ये २५च्या सरासरीने १७८ विकेट घेतल्या. त्याने १६३ वनडे सामन्यामध्ये २४७ विकेट घेतल्या. जोपर्यंत टी-२० क्रिकेट नियमित झाले तोपर्यंत अख्तर आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर होता आणि त्याने आपला वेग गमावला होता. मात्र तरीही त्याने १५ सामन्यांत १९ विकेट मिळवल्या होत्या. अख्तरने १९९९, २००३ आणि २०११ या पाकिस्तानसाठी तीन वर्ल्डकपमध्ये खेळला आणि त्याच वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली.