virat kohli: पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला, मी विराटच्या जागी असतो तर कधी लग्न केले नसते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 25, 2022 | 15:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shoaib akhtar on virat kohli: शोएब अख्तरने सांगितले, मी त्याला वाटतं होते की विराटने १२० शतके ठोकल्यानंतर लग्न करावीत. त्याने हे ही म्हटले की विराटच्या जागी जर तो असता लग्न केले नसते. दरम्यान, हा विराटचा व्यक्तिगत निर्णय होता. 

virat kohli
मी विराटच्या जागी असतो तर कधी लग्न केले नसते - पाक गोलंदाज 
थोडं पण कामाचं
  • शोएब अख्तर विराटबाबत असं काही म्हणाला की...
  • विराटच्या जागी मी असतो तर लग्न केले नसते.
  • शोएबच्या मते विराटने १२० शतके ठोकल्यानंतर लग्न करायला हवे होते.

मुंबई: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने(pakistan former cricketer shoaib akhtar)  विराट कोहली(virat kohli) आणि भारतीय क्रिकेटबाबत अनेक विधाने केली आहेत. त्याने आधी सांगितले की विराटला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. त्याने नेतृत्व सोडले नाही यानंतर त्याने असेही म्हटले की विराट कोहलीला लग्न केले नाही पाहिजे होते. तसेच तो पुढे असंही म्हणाला की तो विराटच्या जागी असता तर त्याने कधीच लग्न केले नसते. शोएब सातत्याने भारतीय क्रिकेटबाबत(indian cricket) विधाने करत असतो. त्याने ३८ वर्षाच्या वयात लग्न केले होते. त्यावेळेस त्याच्या पत्नीचे वय २० वर्षे होते. I wanted him to marry...after scoring 120 centuries, says former cricketer shoaib akhtar

शोएब म्हणाला, जर तो विराटच्या जागी असता तर त्याने कधीच लग्न केले नसते. लग्न केल्यानंतर तुमच्यावर आणखी जबाबदारी येते. शोएबच्या मते  क्रिकेट करिअर संपल्यानंतर लग्न करणे योग्य असते. शोएब म्हणाला, मी जर त्याच्या जागी असतो तर लग्न केले नसते. क्रिकेटच्या १०-१२ वर्षे एक वेगळा काळ असतो. आपल्याला फक्त धावा काढून खेळाची मजा घेतली पाहिजे. मी हे नाही म्हणत आहे की लग्न करणे योग्य नाही मात्र तुम्ही जर इंडियासाठी खेळत आहात तर तुम्हाला त्या वेळेची मजा घेतली पाहिजे. चाहते कोहलीसाठी वेडे आहेत आणि कोहलीनेही ते प्रेम कायम राखले पाहिजे जे त्याला गेल्या २० वर्षांपासून मिळत आहे.

लग्नानंतर जबाबदारी वाढते

शोएब म्हणाला, नक्कीच लग्न आणि कॅप्टन्सी याचा दबाव खेळावर येतो. मुले आणि कुटुंबाचे जास्त प्रेशर असते. जसे जसे जबाबदारी वाढते तसे तसे प्रेशर वाढत जाते. क्रिकेट खेळाडूंचे करिअर हे १४-१५ वर्षांचे असतेता. यातील पाच ते सहा वर्षांचा काळ हा चांगला असतो. विराटचा हा काळ निघून गेला आहे आणि आता त्याला संघर्ष करायचा आहे. 

दोन वर्षांपासून शतक ठोकू शकला नाही विराट

विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून शतक ठोकू शकलेला नाही. यादरम्यान त्याने अनेक खेळी केली आणि शतकाच्या जवळ पोहोचला. मात्र याशिवाय त्याच्या बॅटमधून कोणतीही मोठी धावसंख्या झालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी