सानिया मिर्झानं ‘या’ क्रिकेटपटूला म्हटलं ‘तुझा जीव घेईल’, बघा काय घडलंय असं

Sania Mirza speaks on Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट टीमचा क्रिकेटपटू आणि वनडे टीमचा कॅप्टन बाबर आजम याच्या एका पोस्टवरून सानिया मिर्झानं अशी कमेंट केली की, बघून सर्वांनाच धक्का बसलाय.

Sania Mirza
सानिया मिर्झानं ‘या’ क्रिकेटपटूला म्हटलं ‘तुझा जीव घेईल’  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • सानिया मिर्झा आणि बाबर आजम यांच्यात सोशल मीडियावर मस्ती
  • शोएबच्या प्रश्नावर बाबरनं दिलं भलतंच उत्तर, सानिया भडकली
  • सानियानं कमेंटमध्ये म्हटलं मी तुला जीवे मारेन, जाणून घ्या काय घडलं.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा धडाकेबाज बॅट्समन आणि नवीन कॅप्टन बाबर आजमनं इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत इंस्टाग्राम चॅट केलं. या लाईव्ह बातचित दरम्यान अनेक बाबतीत त्यांची चर्चा झाली आणि मध्येमध्येच थोडी मस्ती पण केली गेला. शोएब मलिकनं बाबर आजमला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, तुमची आवडती वहिनी कोण आहे? या प्रश्नानंतर जे काही घडलं, ते बघून सर्वांना आश्चर्य वाटलं.

जेव्हा शोएब मलिकनं बाबर आजमला प्रश्न विचारला की, तुची आवडती वहिनी कोण आहे? तर यावर आजमनं माजी कॅप्टन सरफराज अहमद यांच्या पत्नीला निवडलं. इकडे बाबर आजमनं आपलं उत्तर दिलं आणि तिकडे कमेंट सेक्शनमध्ये शोएब मलिकच्या पत्नीचा म्हणजेच भारताची दिग्गज टेनिस स्टार सानिया मिर्झाचं कमेंट आलं. सानियानं लिहिलं, ‘मी तुझा जीव घेईन’. यानंतर आपल्या दुसऱ्याच कमेंटमध्ये सानियानं लिहिलं, ‘आता आमच्या काऊचमध्ये तुला झोपायला मिळणार नाही.’

शोएब मलिक टीमचा भाग नाही

पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यान तीन टेस्ट आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचची सीरिज खेळली जाणार आहे. शोएब मलिक खूप काळापासून टीममधून बाहेर आहे आणि तो यावेळी पण पाकिस्तान क्रिकेट टीमच्या इंग्लंड दौऱ्यातील भाग नसेल. पीसीबीनं आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, शोएब मलिक आपल्या कुटुंबियांसोबत काही काळ घालवू इच्छितो म्हणून तो या दौऱ्याचा भाग असणार नाही.

दरम्यान, पाकिस्तानचे एकूण ३१ जण इंग्लंड दौऱ्यावर गेले आहेत त्यात  २० क्रिकेटपटू आणि ११ सपोर्ट स्टाफ आहे. पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडमध्ये मँचेस्टर इथं उतरून त्यांना थेट विशेष बसनं वॉर्सेस्टरशायर इथं नेत १४ दिवस क्वारंटाइन केलं गेलं.  क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर खेळाडूंची पुन्हा चाचणी होईल. ही चाचणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड करणार आहे. या चाचणीत ज्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्यांचाच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी विचार होणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये पॅव्हेलियनमधून मैदानात जाताना प्रत्येकवेळी सर्व खेळाडू आणि पंच (अंपायर) यांना ताप आहे की नाही हे तपासले जाणार आहे. एखाद्याला बरं वाटत नसेल तर त्याला लगेच त्याला वैद्यकीय मदत दिली जाणार आहे.

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात ३ टेस्ट आणि ३ टी-२० मॅच होणार

इंग्लंडमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ३ टेस्ट मॅच आणि ३ टी-२० मॅचेस होणार आहेत. याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात फेब्रुवारी महिन्यात शेवटची टेस्ट मॅच खेळली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी