ICCने २०२३ ते २०२७ पर्यंत जाहीर केला क्रिकेट संघाचा कार्यक्रम, हे आहे भारताचे वेळापत्रक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 17, 2022 | 14:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC releases FTP for 2023-2027: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्व २०२३ ते २०२७ या दरम्यान सर्व क्रिकेट संघासाठीचे तसेच सर्व प्रकारातील कार्यक्रम घोषित केला आहे. 

team india
आयसीसीने जाहीर केला २०२३-२७चा एफटीपी, भारत खेळणार इतके सामने 
थोडं पण कामाचं
  • आयसीसीने जाहीर केला २०२३-२७चा एफटीपी
  • सर्व प्रकारांमद्ये सर्व संघांचा फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर
  • टीम इंडिया वर्ल्डकपआधी २७ वनडे सामने खेळणार

मुंबई: आयसीसीने(icc) बुधवारी २०२३-२७ या कालावधीसाठी पुरुषांच्या फ्युतर टूर प्रोग्रामची(future tour programme) घोषणा केली आहे. या एफटीपीमद्ये सर्व क्रिकेट संघांचे क्रिकेटच्या सर्व प्रकारातील कार्यक्रम सामील आहेत. एकूण मिळून यात ७७७ आंतरराष्ट्रीय सामने आहेत. यात १३७ कसोटी, २८१ वनडे आणि ३२३ टी-२० सामने सामील आहेत. हे गेल्या वेळच्या एफटीपीपेक्षा ८३ सामने अधिक आहेत. ICC announce Future tour programme for 2023-27

अधिक वाचा - BJP संसदीय समितीची घोषणा; दिल्लीश्वरांचा महाराष्ट्राला धक्का

भारतीय संघांच्या कार्यक्रमांबाबत बोलायचे झाल्यास टीम इंडिया २०२३ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या आधी २७ वनडे सामने खेळणार आहे. या कार्यक्रम चक्रात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पाच-पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत या एफटीपी कार्यक्रमादरम्यान १८ ऑगस्ट २०२२ पासून ते फेब्रुवारी २०२७ या दरम्यान ४४ कसोटी, ६३ वनडे आणि ७६ टी-२० सामने खेळणार आहे. 

या दरम्यान सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंडचा संघ खेळणार आहे. इंग्लंडचा संघ २२ कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २१ कसोटी आणि भारतीय संघ २० कसोटी सामने खेळणार आहेत. द्वीपक्षीय मालिकेव्यतिरिक्त चार वर्षीय एफटीपीच्या कार्यक्रमादरम्यान आयसीसी वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीचा एक-एक हंगाम रंगणार आहे. तर टी-२० वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्सचे प्रत्येकी २ हंगाम रंगणार आहेत. 

अधिक वाचा - बाथरूममध्ये ठेवा 'या' रंगाची बादली, बदलेल नशीब

वर्कलोड वाढला

सध्याच्या घडीला एफटीपीमध्ये ६९४ सामने आहेत. यात आयसीसी मेन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन हंगाम, आयसीसीचे अनेक इव्हेंट, तसेच द्वीपक्षीय मालिका आणि ट्राय सीरिजच्या सामन्यांचा समावेश आहे. यावरून स्पष्ट दिसते की येणारा एफटीपी अधिक बिझी असेल. अशातच वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक देशाची स्वत:ची अशी एक टी-२० लीग आहे जी तब्बल २ महिने सुरू असते. अशातच इतके जास्त क्रिकेट खेळणे कोणासाठी सोपे नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी