BCCI पुढे ICC झुकली, जोपर्यंत IPL आहे तोपर्यंत दुसरा आंतरराष्ट्रीय सामना नाही होणार

2024 पासून सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) आगामी फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) मध्ये IPL साठी विशेषत: अडीच महिन्यांची तरतूद आहे आणि या काळात कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट होणार नाही.

ICC bowed before IPL: As long as there is IPL, there will be no second international match;
BCCI पुढे ICC झुकली, जोपर्यंत IPL आहे तोपर्यंत दुसरा आंतरराष्ट्रीय सामना नाही होणार ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयने आयपीएलसाठी अडीच महिन्यांची विंडो ठेवली आहे
  • उर्वरित जागतिक बोर्ड बीसीसीआयकडेच राहतील
  • भविष्यात आयपीएल सामन्यांची संख्या वाढेल

International Cricket Council : जोपर्यंत आयपीएल चालू आहे, तोपर्यंत कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा मालिका होणार नाही. आयसीसीने आयपीएलला दरवर्षी अडीच महिन्यांची विडो देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) विरोध केला असला, तरी आयसीसीने आपला विरोध बाजूला सारला आहे. (ICC bowed before IPL: As long as there is IPL, there will be no second international match;)

अधिक वाचा : Murali Sreeshankar ची ऐतिहासिक उडी, पुरुषांच्या लाॅंग जंपच्या फायनलमध्ये क्‍वालिफाय ठरणारा पहिला भारतीय क्रीडापटू

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. अलीकडेच त्याचे प्रसारण हक्क 48.3 हजार कोटींना विकले गेले आहेत. आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC)नेही आपल्या शक्तीपुढे नमते घेतले आहे. ICC ने 2023 ते 2027 या कालावधीतील आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका आणि स्पर्धांचा फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) तयार केला आहे. यामध्ये आयसीसीच्या १२ पूर्णवेळ सदस्यांविरुद्धच्या सामन्यांचा समावेश आहे. नवीनतम FTP मध्ये दोन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, इतर ICC स्पर्धा आणि अनेक द्विपक्षीय मालिका समाविष्ट आहेत.

अधिक वाचा : आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत देशाचे नाव महाराष्ट्र उंचावणार : विक्रम रोठे

क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, आयपीएलला भविष्यातील टूर प्रोग्रामच्या कॅलेंडरमध्ये दरवर्षी अडीच महिन्यांची विंडो मिळते. आयपीएलचे आयोजन मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केले जाणार आहे. 2023 आणि 2024 IPL मध्ये 74-74 सामने खेळवले जातील. 2025 आणि 2026 मध्ये 84 आणि 2027 पर्यंत दरवर्षी 94 आयपीएल सामने खेळले जाण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा : Team india: दुसऱ्या वनडेत डॉक्टर बनला रोहित शर्मा, स्वत:च केले खांद्याचे उपचार
आयपीएल व्यतिरिक्त जेव्हा ऑस्ट्रेलियात 'द हंड्रेड' आणि इंग्लंडमध्ये 'बिग बॅश लीग' आयोजित केली जाते. त्या काळात दोन्ही देशांचे संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाहीत. मात्र, या काळात इतर संघ क्रिकेट खेळत राहतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे थांबणार नाही. त्याचबरोबर आयपीएलदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट जवळपास थांबणार आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा कॅरेबियन प्रीमियर लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीग खेळल्या जात आहेत, तेव्हा वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाहीत. 25 आणि 26 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे ICC च्या वार्षिक बैठकीनंतर हा FTP औपचारिकपणे सार्वजनिक केला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी