ICC World Cup 2019: सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, हे चार संघ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये खेळणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 24, 2019 | 12:51 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ICC World Cup 2019: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये कोण असेल याचा अद्याप विश्वास नाही आहे मात्र तीन संघांबाबत त्याला विश्वास आहे.

sachin tendulkar
सचिन तेंडुलकर  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये कोण खेळणार याचे भाकीत वर्तवले आहे. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या तेंडुलकरने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये यजमान इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया जागा बनवतील मात्र चौथ्या संघाबाबत त्याला तितका विश्वास नाही आहे. तेंडुलकरने न्यूझीलंड आणि पाकिस्तानपैकी एका संघाला सेमीफायनलमध्ये जागा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

ईएसपीएनक्रिकइफोला दिलेल्या मुलाखतीतत तेंडुलकरला सेमीफायनलमध्ये कोणते संघ पोहोचतील हे विचारण्यात आले. ४६ वर्षीय तेंडुलकर म्हणाला, भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील हे जवळ जवळ निश्चित आहे. चौथा संघ न्यूझीलंड अथवा पाकिस्तान यांच्यापैकी एक असू शकतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मतांचा विचार केला तर यजमान इंग्लंड आणि टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या अधिक शक्यता आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही संघांनी वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 

२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केवळ दोन वनडे सीरिज गमावल्या आहेत. तर इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ सलग ११ वनडे सीरिज जिंकून वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या दरम्यान वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियानेही आपली गमावलेली लय पुन्हा मिळवली आहे. गेल्या वर्षीपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ जोरदार संघर्ष करत होता. मात्र आता त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान संघाला त्यांच्याच्या घरात मात देत आपला विश्वास पुन्हा उंचावला आहे. जेथे सचिन तेंडुलकरला सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या चौथ्या टीमबाबत विश्वास नाहीये त्यासाठी पाच दावेदार उपस्थित आहेत. २०१५च्या वर्ल्डकपमध्ये रनरअप न्यूझीलंडव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघही वर्ल्डकपमधील चांगल्या कामगिरीसाठी सज्ज आहेत. 

२०१९च्या वर्ल्डकपची सुरूवात ३० मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये होत आहे. भारतीय संघाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना ५ जूनला होत आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. यावेळी राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळवले जाणार आहेत. यात प्रत्येक संघाला अन्य ९ प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकतरी सामना खेळावाच लागेल. पॉईंट टेबलमध्ये सर्वाधिक पॉईंट असणारे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. फायनल सामना १४ जुलैला होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि द. आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. 

वर्ल्डकपमधील संपूर्ण कार्यक्रम

  1. इंग्लंड विरुद्ध द. आफ्रिका - ३० मे- लंडन - दुपारी ३ वाजता
  2. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज - ३१ मे - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  3. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका - १ जून - कार्डिफ - दुपारी ३ वाजता
  4. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - १ जून - ब्रिस्टल - संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
  5. बांगलादेश विरुद्ध द. आफ्रिका - २ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  6. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - ३ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  7. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - ४ जून कार्डिफ - दुपारी ३ वाजता
  8. भारत विरुद्ध द.आफ्रिका - ५ जून - साऊथम्प्टन - दुपारी ३ वाजता
  9. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड - ५ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  10. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडीज - ६ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  11. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका - ७ जून - ब्रिस्टल - दुपारी ३ वाजता
  12. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश - ८ जून - कार्डिफ - दुपारी ३ वाजता
  13. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड - ८ जून - टॉन्टन- संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
  14. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ९ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  15. वेस्ट इंडिज विरुद्ध द. आफ्रिका - १० जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  16. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ११ जून- ब्रिस्टल - दुपारी ३ वाजता
  17. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान १२ जून टॉन्टन - दुपारी ३ वाजता
  18. भारत विरुद्ध न्यूझीलंड - १३ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  19. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - १४ जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  20. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - १५ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  21. अफगाणिस्तान विरुद्ध द. आफ्रिका - १५ जून - कार्डिफ - संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
  22. भारत विरुद्ध पाकिस्तान - १६ जून - मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  23. बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज - १७ जून - टॉन्टन - दुपारी ३ वाजता
  24. अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड - १८ जून - मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  25. न्यूझीलंड विरुद्ध साउथ अफ्रीका - १९ जून - बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  26. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश - २० जून - नॉटिंघम - दुपारी ३ वाजता
  27. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - २१ जून - लीड्स - दुपारी ३ वाजता
  28. भारत विरुद्ध अफगाणिस्तान - २२ जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  29. न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडीज - २२ जून - मँचेस्टर - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  30. पाकिस्तान विरुद्ध साउथ अफ्रीका - २३ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  31. अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश - २४ जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  32. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया - २५ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  33. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - २६ जून - बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  34. भारत विरुद्ध वेस्टइंडीज - २७ जून - मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  35. द. आफ्रिका विरुद्ध श्रीलंका - २८ जून - चेस्टर ले स्ट्रीट - दुपारी ३ वाजता
  36. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान - २९ जून - लीड्स - दुपारी ३ वाजता
  37. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - २९ जून - लंडन - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  38. भारत विरुद्ध इंग्लंड - ३० जून - बर्मिंग्हमन - दुपारी ३ वाजता
  39. श्रीलंका विरुद्ध वेस्टइंडीज - १ जुलै- चेस्टर ले स्ट्रीट - दुपारी ३ वाजता
  40. भारत विरुद्ध बांग्लादेश - २ जुलै- बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  41. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड - ३ जुलै- चेस्टर ले स्ट्रीट - दुपारी ३ वाजता
  42. अफगाणिस्तान विरुद्ध वेस्टइंडीज - ४ जुलै- लीड्स - दुपारी ३ वाजता
  43. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश - ५ जुलै- लंडन - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  44. भारत विरुद्ध श्रीलंका - ६ जुलै- लीड्स - दुपारी ३ वाजता
  45. ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका - ७ जुलै- मँचेस्टर - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  46. पहला सेमीफाइनल - ९ जुलै- मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  47. दूसरा सेमीफाइनल - ११ जुलाई- बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  48. फायनल - १४ जुलै- लंडन (लॉर्ड्स) - दुपारी ३ वाजता 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी