IND vs SA, World Cup 2019: भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय, रोहित आणि चहल चमकले

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 05, 2019 | 22:59 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

World Cup 2019 Match 8, IND vs SA Live Score: भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आज वर्ल्डकपमध्ये आमने सामने आहेत. सामन्याचे क्षणाक्षणाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहा...

india vs south africa
भारत वि दक्षिण आफ्रिका 

साऊथम्पटन : रोहित शर्माचे शानदार शतक आणि युजवेंद्र चहल यांच्या चार विकेटच्या जोरावर भारताने वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना सहा गडी राखून जिंकला.   वर्ल्ड कपमधील आठवी मॅच टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाली. ही मॅच टीम इंडियाची पहिलीच मॅच होती आणि ही मॅच जिंकत भारताने यंदाच्या वर्ल्ड कपमधील विजयाचा श्रीगणेशा केला. तर, दक्षिण आफ्रिकेला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 9 विकेट्स गमावत 227 रन्स केले. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने  हे आव्हान  ४७.३ ओव्हर्समध्ये गाठलं आणि विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या मॉरिस याने एक आणि फिलुकवायो याने एक विकेट घेतली. स्पीनर्सला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.  भारताकडून रोहित शर्मा याने १४४ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. त्याला धोनी ३४ आणि लोकेश राहुल २६ धावांची साथ दिली. 

भारताविरुद्ध साऊथम्पटन मध्ये सुरु असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या आफ्रिकेच्या संघासाठी हा निर्णय चुकीचा ठरला आणि त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या २२७ धावांत गारद झाला. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करताना आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भारताच्या जसप्रीत बुमराहने भारताला चांगली सुरूवात करून दिली. त्याने २४ धावांत दोन बळी मिळवले. यानंतर चहल आणि कुलदीप यादव यांनीही त्याला चांगली साथ देताना आफ्रिकेच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. युझवेंद्र चहलने या सामन्यात विकेटचा चौकार ठोकला. त्यामुळे आफ्रिकेला केवळ २२७ धावा करता आल्या. 

आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर ख्रिस मॉरिसने ४२ धावा केल्या. ८ धावांपासून तो शतक करण्यापासून चुकला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट युझवेंद्र चहलने घेतल्या. त्याने १० ओव्हरमध्ये ५१ धावा देताना ४ बळी मिळवले. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. 

सलग दोन सामन्यात पराभव पत्करल्याने द. आफ्रिकेचे मनोबल खच्ची झाले आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे विजयाची चांगली संधी आहे. त्यातच आफ्रिकेसाठी आणखी एक वाईट बातमी म्हणजे त्यांचा गोलंदाज डेल स्टेन या वर्ल्डकपमध्ये खेळू शकत नाही. दुखापतीमुळे तो वर्ल्डकपमधून बाहेर आहे. स्टेनच्या जागी वेगवान गोलंदाज ब्युरॉन हेंड्रिक्सला संधी देण्यात आली आहे. 

 

 

लाईव्ह हायलाईट्स

भारताचा डाव

 1. भारताचा सहा गडी राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय, भारताची वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात. दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव
 2. भारताला चौथा मोठा धक्का  महेंद्र सिंग धोनी बाद क्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर क्रिस मॉरिसने घेतला कॅच 
 3. भारताच्या ४४.१ ओवरमध्ये २०० धावा पूर्ण झाल्या आहेत. रोहित शर्मा १४० बॉलमध्ये १२० धावांवर तर महेंद्रसिंग धोनी ४१ बॉलमध्ये ३० धावांवर खेळत आहे.   
 4. रोहित शर्माचे शतक पूर्ण. १२८ बॉलमध्ये १० चौकर आणि २ षटकार १०० धावा पूर्ण केल्या आहेत. हे रोहितचे २३ वे शतक असून वर्ल्ड कपमधील दुसरे शतक आहे.  
 5. भारताच्या ३४.५ ओवरमध्ये १५० धावा पूर्ण झाल्या आहेत. रोहित शर्मा ११० बॉलमध्ये ८८ धावांवर खेळत आहे तर महेंद्रसिंग धोनी ११ बॉलमध्ये ६ धावांवर खेळत आहे. 
 6. भारताचा तिसरा झटका लोकेश राहुल बाद कॅगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर फाफ डू प्लेसिसने घेतला कॅच. राहूलने ४२ बॉलमध्ये २६ रन्स केले आहेत.  
 7. २५.५ ओवरमध्ये भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या असून रोहित ५४ धावांवर तर राहूल १८ धावांवर खेळत आहे. 
 8. रोहीत शर्माचे अर्धशतक पूर्ण. त्याने ७० बॉलमध्ये आपल्या ५० धावा पूर्ण केल्या 
 9. भारताचा दुसरा धक्का विराट कोहली बाद आंदिले फेहुक्वायोच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकने उडवली विकेट. विराटने ३४ बॉल खेळत १८ रन काढले आहेत. 
 10. भारताला पहिला मोठा धक्का शिखर धवन बाद. कॅगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकने केलं बाद. शिखर धवन १२ बॉल्समध्ये ८ रन काढु शकला.  
 11. भारताच्या फलंदाजीला सुरूवात झाली असून पहिल्याचा ओवरमध्ये शिखर धवनच्या बॅटचा तुकडा पडला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

 1. दक्षिण आफ्रिकेने भारताला  विजयासाठी २२८ रन्सचे  आव्हान ठेवले आहे. 
 2. क्षिण आफ्रिकेला नववा धक्का इमरान ताहिर बाद. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर केदार जाधवने घेतला कॅच.  
 3. दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का क्रिस मॉरिस बाद. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला कॅच   
 4. ४६ ओवरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या २०० धावा पूर्ण झाल्या आहेत. 
 5. दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का. युझवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजीवर आंदिले फेहुक्वायोला महेंद्रसिंग धोनीने केले स्टंप आऊट.चहलची ही चौथी विकेट आहे. आंदिले फेहुक्वायोने ६१ बॉल खेळत ३४ धावा केल्या आहेत.  
 6. दक्षिण आफ्रिकेचा सहवा धक्का युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर डेविड मिलर बाद झाला असुन चहलची ही तिसरी विकेट आहे. डेविड मिलरने ४० बॉलमध्ये ३१ धावा काढल्या.
 7. २४ ओवरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत.
 8. भारतीय गोलंदाजांना पाचवे यश, कुलदीपची भेदक गोलंदाजीवर जे पी ड्युमिनी एलबीडब्ल्यू.  जे पी ड्युमिनीने ११ बॉल खेळत ३ रन काढले.
 9. दक्षिण आफ्रिकेचा चौथा गडी बाद, युझवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजीने फाफ डू प्लेसिस तंबूत परतला. फाफ डू प्लेसिसने ५४ बॉलमध्ये ३८ धावा काढल्या.
 10. दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका देण्यास भारताला यश युझवेंद्र चहलच्या फिरकीने रासी वॅन डेर डुसैनला तंबूत धाडले.  
 11. दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक पूर्ण १४ ओवरमध्ये ५० धावा काढल्या. 
 12. क्विंटन डी कॉक १७ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला
 13. ५.५ षटकांत भारताचा आफ्रिकेला दुसरा धक्का, जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉकला केले बाद
 14. भारताला दुसरे यश क्विंटन डी कॉक बाद, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला कॅच  
 15. भारताला पहिलं यश  हाशिम आमला बाद जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने घेतला कॅच  
 16. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 
 17. सामन्याला थोड्यात वेळात होणार सुरूवात
 18. आज भारत वि. द. आफ्रिका सामना

 


दोन्ही संघ

भारतीय संघ - विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी(विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि विजय शंकर. 

द. आफ्रिका - फाफ डू प्लेसिस, डेविड मिलर, एडिन मार्कराम, हाशिम आमला, रासी वॅन डेर डुसैन, क्विंटन डी कॉक, कॅगिसो रबाडा, लुंगी एंगिडी, इम्रान ताहीर, ब्युरॉन हेंड्रिक्स, तबरेज शम्सी, जे पी ड्युमिनी, क्रिस मॉरिस, आंदिले फेहुक्वायो आणि ड्वायेन प्रीटोरियस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी