AUS vs PAK Live Score, World Cup 2019: ऑस्ट्रलियाचा पाकिस्तानवर विजय

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 13, 2019 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Australia vs Pakistan cricket match Live score: वर्ल्ड कप 2019 मधील 17वी मॅच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या टीममध्ये झाली आणि ही मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. पाहा या मॅचचा लाइव्ह स्कोअर आणि अपडेट्स...

World Cup 2019: AUS vs PAK match
वर्ल्ड कप 2019: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान मॅच 

टाँटन: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील 17वी मॅच आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झाली. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या टीमचा पराभव केला आहे. या मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात सहा पॉईंट्स झाले आहेत. यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर पाकिस्तानच्या टीमने चार मॅचेसपैकी एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे, दोन मॅचेसमध्ये पराभव झाला आहे तर एक मॅच रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात तीन पॉईंट्स आहेत. यामुळे पाकिस्तानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमचं नेत्रृत्व सरफराज अहमद याच्याकडे आहे तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचं नेत्रृत्व अॅरोन फिंच याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियन टीममध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे तुफानी बॅट्समन आहेत. तर, पाकिस्तानच्या टीममध्ये फखर झमान, बाबर आझम, सरफराज अहमद आणि मोहम्मद आमिर यांच्यासारखे बॉलर्स आहेत.

आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 9 मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी 5 मॅचेस ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत तर पाकिस्तानने 4 मॅचेस जिंकल्या आहेत.

LIVE हायलाईट्स

पाकिस्तानचा डाव

 1.  ऑस्ट्रलियाचा पाकिस्तानवर ४१ धावांनी दणदणीत विजय विजय.
 2. ४५.५ ओव्हरमध्ये पाकिस्तानचे सर्व गडी बाद.
 3. पाकिस्तानला नववा धक्का मिचेल स्टार्क गोलंदाजीवर मोहम्मद आमिर बाद. 
 4. पाकिस्तानला आठवा धक्का वहाब रियाझ बाद मिचेल स्टार्क गोलंदाजीवर अॅलेक्स केरीने घेतला कॅच. 
 5. पाकिस्तानला विजयासाठी ३९ बॉलमध्ये ४७ धावांची गरज
 6. पाकिस्तानला सातवा धक्का हसन अली बाद. केन रिचर्ड्सनच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाने घेतला कॅच.
 7. पाकिस्तानच्या ३३.४ ओव्हरमध्ये २०० धावा पूर्ण 
 8. पाकिस्तानला सहावा धक्का आसिफ अली बाद. केन रिचर्ड्सनच्या गोलंदाजीवर अॅलेक्स केरीने घेतला कॅच. 
 9. पाकिस्तानच्या २८ ओव्हरमध्ये १५० धावा पूर्ण
 10. पाकिस्तानला पाचवा धक्का शोएब मलिक बाद.पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अॅलेक्स केरीने घेतला कॅच. 
 11. मोहम्मद हफीजने ४९ बॉलमध्ये ४६ धावा काढल्या आहेत.
 12. पाकिस्तानला चौथा धक्का मोहम्मद हफीज बाद. अॅरोन फिंचच्या गोलंदाजीवर मिचेल स्टार्कने घेतला कॅच. 
 13. पाकिस्तानला तिसरा धक्का इमाम-उल-हक बाद. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अॅलेक्स केरीने घेतला कॅच.
 14. इमाम-उल-हकच्या ७३ बॉलमध्ये ५२ धावा पूर्ण
 15. मोहम्मद हफीज २८ बॉलमध्ये ३२ धावांवर तर इमाम-उल-हक ५३ बॉलमध्ये ३३ धावांवर खेळत आहे.
 16. १८.३ ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. 
 17. पाकिस्तानला दूसरा धक्का बाबार आझम बाद. नॅथन कोल्टर नाइलच्या गोलंदाजीवर केन रिचर्ड्सनने घेतला कॅच.
 18. इमाम उल हक ३३ बॉलमध्ये १९ धावांवर तर बाबर आझम २१ बॉलमध्ये २२ धावांवर खेळत आहे.
 19. १० ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या ५१ धावा पूर्ण झाल्या आहेत.
 20. पाकिस्तानला पहीला धक्का फखर झमान बाद पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर केन रिचर्ड्सनने घेतला कॅच
 21. पाकिस्तानचा डाव सुरू झाला असून विजयासाठी ३०८ धावांची गरज 

ऑस्ट्रेलियाचा डाव

 1. ऑस्ट्रलियाचे पाकिस्तानला ३०७ धावांचे आव्हान

 2. ४९ ओव्हरमध्ये ऑस्ट्रलियाचे ३०७ धावांवर सर्व गडी बाद झाले आहेत. 

 3. ऑस्ट्रलियाला नववा धक्का अॅलेक्स केरी बाद. मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यु आऊट. मोहम्मद आमिरची ही चौथी विकेट आहे.

 4. ऑस्ट्रलियाला आठवा धक्का पॅट कमिन्स बाद. हसन अलीच्या गोलंदाजीवर सरफराज अहमदने घेतला कॅच.

 5. ऑस्ट्रलियाच्या ४७ ओव्हरमध्ये ३०० धावा पूर्ण

 6. ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का. नॅथन कोल्टर नाइल बाद. वहाब रियाझच्या गोलंदाजीवर सरफराज अहमदने घेतला कॅच.

 7. ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का मिचेल मार्श बाद. मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर शोएब मलिकने घेतला कॅच

 8. ऑस्ट्रेलियाचा पाचवा गडी उस्मान ख्वाजा बाद.  मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर वहाब रियाझने घेतला कॅच. उस्मान ख्वाजाने १६ बॉवमध्ये १८ धावा काढल्या आहेत. 

 9. ३९.३ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या २५० धावा पूर्ण

 10. ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का डेव्हिड वॉर्नर बाद. शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर इमाम-उल-हकने घेतला कॅच

 11. डेव्हिड वॉर्नरचे १०२ बॉलमध्ये १२१ धावा पूर्ण

 12. ऑस्ट्रेलियाला तिसरा गडी पवेलियनमध्ये परतला आहे. शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेल बाद 

 13. ३१.४ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या २०० धावा पूर्ण
 14. ऑस्ट्रेलियाचा दूसरा गडी तंबुत परतला. स्टीव्ह स्मिथ बाद मोहम्मद हफीजच्या गोलंदाजीवर आसिफ अलीने घेतला कॅच  
 15. ऑस्ट्रेलियाच्या २३.१ ओव्हरमध्ये १५३ धावा पूर्ण
 16. अॅरॉन फिंचने ८४ बॉलमध्ये ८२ धावा काढल्या. 
 17. ऑस्ट्रेलियाला पहीला धक्का. अॅरॉन फिंच बाद मोहंमद अमीरच्या गोलंदाजीवर मोहंमद हाफिजने घेतला कॅच.
 18. ऑस्ट्रेलियाचे शतक पूर्ण तर एरॉन फिंचच्या ६३ बॉलमध्ये ५२ धावा पूर्ण
 19. ९.१ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक पूर्ण
 20. ऑस्ट्रेलियाच्या ५ ओव्हरमध्ये २७ धावा पूर्ण
 21. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु झाला आहे. अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर मैदान उतरले आहेत.
 22. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा घेतला निर्णय
 23. पाकिस्तानने टॉस जिंकला

 

संभाव्य टीम

ऑस्ट्रेलियाची टीम: अॅरोन फिंच (कॅप्टन), जेसन बेहरेंड्रॉफ, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नॅथन कोल्टर नाइल, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा

पाकिस्तानची टीम: सरफराज अहमद (कॅप्टन), फखर झमान, इमाम-उल-हक, बाबार आझम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वसिम, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हसनैन.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी