IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 13, 2019 | 21:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand World Cup 2019 : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप 2019 मधील 18वी मॅच पावसामुळे रद्द झाली आहे. यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण प्रदान करण्यात आला आहे.

IND vs NZ
भारत विरुद्ध न्यूझीलंड 

नॉटिंगहॅम : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारत आणि न्यूझीलंड दरम्यानाचा सामना गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज रद्द करण्यात आला. यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण प्रदान करण्यात आला आहे.  पावसामुळे रद्द झालेला हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील चौथा सामना आहे. यापूर्वी तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.  या रद्द झालेल्या सामन्यामुळे न्यूझीलंड ७ अंकासह पहिल्या स्थानावर आणि भारत ५ अंकासह तिसऱ्या स्थानावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाने ३ सामने जिंकल्याने त्यांचे ६ गुण आहेत. तर श्रीलंका आणि इंग्लंडचे ४ अंक आहेत.  

या शानदार आणि महत्त्वपूर्ण सामन्यासाठी दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज होते. न्यूझीलंडने या वर्ल्ड कपमध्ये आपले तीन पैकी तीन सामने जिंकले होते. त्यांनी तीनही आशियाई संघाना पराभूत केले आहे. यात श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. टीम इंडियाने देखील आपले दोन पैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यामुळे या स्पर्धेत एकही पराभव न पत्करलेल्या संघांची कसोटी होती. पण आजच्या सामन्यामुळे भारताच्या घोडदौरीला ब्रेक बसला आहे. 

या सामन्यात एक एक गुण प्राप्त झाल्याचा फायदा न्यूझीलंडला अधिक आहे. आता त्यांना सेमिफायनलमध्ये जागा मिळविण्यासाठी केवळ दोन सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा पाइंट खूप महत्वाचा ठरणार आहे. तर भारताला या पाइंटमुळे म्हणावा तसा फायदा झालेला नाही. त्यामुळे आता त्यांना पुढील सर्व सामने जिंकणे महत्त्वाचे असणार आहेत. भारताच पुढील सामना हा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. तसेच आणखी एक बलाढ्य संघ वेस्ट इंडिजशी होणार आहे, त्यामुळे भारताला पुढील काही सामने अवघड आहेत. 

 

LIVE हायलाईट्स

 

 1. पावसाची संततधार आणि आऊटफिल्ड ओली असल्यामुळे भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आले. 
 2. नॉटिंगहॅम येथे पुन्हा पावसाला सुरूवात
 3. मैदानातून कवर्स काढण्यात आले, थोड्याच वेळात होणार टॉस
 4. पावसामुळे टॉसला उशीर
 5. भारत-न्यूझीलंड मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय
 6. टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शिखर धवनला दुखापत झाल्याने ओपनिंग आणि चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
 7. टीम इंडियाच्या प्रॅक्टिस दरम्यानचे काही फोटोज 
 8. India
 9. शिखर धवन दुखापग्रस्त आहे मात्र, प्रॅक्टिस सेशन दरम्यान तो मैदानात उपस्थित होता
 10. Shikhar Dhawan
 11. मात्र, प्रॅक्टिस दरम्यानही पावसाचा व्यत्यय आल्याचं पहायला मिळालं
 12. Indian cricket team
 13. टीम इंडियासोबतच विराट कोहलीने नेट प्रॅक्टिस केली 
 14. virat kohli

 

संभाव्य टीम्स:

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

न्यूझीलंडची टीम: केन विल्सम्सन (कॅप्टन), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फर्ग्युसन, हेन्री निकोल्स.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द Description: India vs New Zealand World Cup 2019 : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप 2019 मधील 18वी मॅच पावसामुळे रद्द झाली आहे. यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण प्रदान करण्यात आला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola