World Cup 2019: इंग्लंडच्या पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पाहा काय झाले बदल 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 27, 2019 | 02:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019 Points Table: विश्वचषक २०१९ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळवून आपली उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित केली आहे. तर इंग्लंडला आता करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

aus_AP
इंग्लंडच्या पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पाहा काय झाले बदल  |  फोटो सौजन्य: AP

लंडन: क्रिकेट विश्वचषक २०१९ मधील लीग मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ६४ धावांनी विजय मिळवत दोन महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली आहे. या दोन गुणांमुळे आता ऑस्ट्रेलिया संघ पॉईंट्स टेबलमध्ये थेट पहिल्या स्थानी पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाने सातपैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांच्या खात्यात १२ गुण जमा आहेत. मालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाचेच सर्वाधिक गुण आहेत. दुसरीकडे इंग्लंडला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याच्या खूप शक्यता आहेत. कारण की, सात सामन्यांपैकी इंग्लंडने फक्त चारच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात आठच गुण आहेत. त्यामुळे पुढील दोन्ही सामने जिंकणं आता इंग्लंडसाठी अतिशय गरजेचं आहे. कारण तसं न झाल्यास ते या स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे. 

इंग्लंडच्या या पराभवामुळे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा अजूनही टिकून आहेत. यापैकी बांगलादेशला सर्वाधिक संधी आहे. कारण की श्रीलंकेपेक्षा त्यांच्याकडे १ गुण जास्त आहे तर पाकिस्तानपेक्षा दोन गुण. यामुळे जर पुढील दोन्ही सामन्यात इंग्लंड पराभूत झालं आणि बांगलादेशने विजय मिळवला तर बांगलादेश उपांत्य फेरीत धडक मारू शकतं. त्यामुळे आता इंग्लंडसाठी करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

दुसरीकडे भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक कमी म्हणजे पाचच सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ मध्ये विजय मिळवले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारताच्या खात्यात ९ गुण जमा आहेत. अद्यापही भारताचे ४ सामने बाकी आहेत. त्यामुळे हे सामने जिंकून भारत उपांत्य फेरीत सहजपणे धडक मारू शकतो. 

सध्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड ११ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी ६ सामन्यात ५ विजय मिळवले आहेत. तर त्यांचा एक सामना रद्द झाला होता. ११ गुणांची कमाई केल्यामुळे न्यूझीलंड देखील उपांत्य फेरीत पोहचल्याचं जवळपास निश्चित आहे. पण तरीही पुढील काही सामन्यांवर बरंच काही अवलंबून असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: इंग्लंडच्या पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पाहा काय झाले बदल  Description: World Cup 2019 Points Table: विश्वचषक २०१९ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळवून आपली उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित केली आहे. तर इंग्लंडला आता करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Loading...
Loading...
Loading...