World Cup 2019: इंग्लंडचा अफगाणिस्तानवर 150 रन्सने विजय, पाहा पॉईंट्स टेबलमध्ये काय झाले बदल

World Cup 2019, Points Table: इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या मॅचमध्ये इंग्लडने अगदी सहज विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने मोठा स्कोअर उभा करत सर्वांनाच एक धक्का दिला. पाहा पॉईंट्स टेबल..

Cricket World Cup 2019: England vs Afganistan
इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान  |  फोटो सौजन्य: AP

मँचेस्टर: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील 24वी मॅच इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झाली. या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने तुफानी बॅटिंग करत अफगाणिस्तानच्या बॉलर्सला चांगलाच घाम फोडला. इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या टीमने 50 ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावत 397 रन्स इतका मोठा स्कोअर उभा केला. इंग्लंडच्या टीमने दिलेलं हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या टीमला 50 ओव्हर्समध्ये 247 रन्सपर्यंतच मजल मारता आली. अफगाणिस्तानच्या टीमने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 247 रन्स केले.

इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानच्या बॉलर्सला अक्षरश: लोळवलं. इंग्लंडच्या टीमचा कॅप्टन इयॉन मॉर्गन याने तुफानी बॅटिंग करत अवघ्या 71 बॉल्समध्ये 148 रन्सची खेळी खेळली. मॉर्गनच्या या खेळीत 17 सिक्सर आणि चार फोर चा समावेश आहे. मॉर्गन प्रमाणेच जॉनी बेअरस्ट्रो याने सुद्धा 99 बॉल्समध्ये 99 रन्स केले. रूटने 82 बॉल्समध्ये 88 रन्सची इनिंग खेळली अशा प्रकारे इंग्लंडच्या टीमने सहा विकेट्स गमावत 397 रन्स केले. इंग्लंडच्या टीमने केलेला हा स्कोअर यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च स्कोअर ठरला आहे. इंग्लंडच्या टीमने दिलेलं आव्हान अफगाणिस्तानच्या टीमला गाठता आलं नाही. यामुळे इंग्लंडच्या टीमने अफगाणिस्तानवर 150 रन्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंडच्या टीमने अव्वल क्रमांक गाठला आहे. 

इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान मॅचनंतर वर्ल्ड कपचं पॉईंट्स टेबल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: इंग्लंडचा अफगाणिस्तानवर 150 रन्सने विजय, पाहा पॉईंट्स टेबलमध्ये काय झाले बदल Description: World Cup 2019, Points Table: इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या मॅचमध्ये इंग्लडने अगदी सहज विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने मोठा स्कोअर उभा करत सर्वांनाच एक धक्का दिला. पाहा पॉईंट्स टेबल..
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola