World Cup 2019: न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिकेच्या मॅचनंतर पाहा पॉईंट्स टेबलमध्ये कुठली टीम कुठल्या क्रमांकावर

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 20, 2019 | 00:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019 Points Table: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी अतिशय अटीतटीची मॅच झाली. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. पाहा या मॅचनंतर वर्ल्ड कप पॉईंट्स टेबल...

New Zealand vs South Africa
New Zealand vs South Africa  |  फोटो सौजन्य: AP

बर्मिंगहॅम: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील 25वी मॅच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाली. ही मॅच खूपच अटीतटीची झाली. शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचलेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमने विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने दिलेलं आव्हान न्यूझीलंडच्या टीमने 3 विकेट्स आणि चार बॉल शिल्लक ठेवत गाठलं आणि विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंडची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 

पाऊस पडल्याने मॅच सुरू होण्यास उशीर झाला आणि त्यामुळे ही मॅच 49 ओव्हर्सची खेळवण्यात आली. मॅचच्या सुरूवातीला न्यूझीलंडच्या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरली मात्र, त्यांना मोठा स्कोअर करण्यात यश आलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 49 ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावत 241 रन्सपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने दिलेलं हे आव्हान न्यूझीलंडची टीम सहज गाठेल असं वाटत होतं मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सने न्यूझीलंडच्या बॅट्समनलाही चांगलाच घाम फोडला त्यामुळे ही मॅच खूपच रंगतदार झाली. अखेर न्यूझीलंडच्या टीमने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. न्यूझीलंडकडून कॅप्टन केन विल्यम्सन याने खेळलेली शानदार इनिंग विजयात खूपच महत्वाची ठरली.

पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम 9 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड, चौथ्या क्रमांकावर टीम इंडिया आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या मॅचनंतर पॉईंट्स टेबल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिकेच्या मॅचनंतर पाहा पॉईंट्स टेबलमध्ये कुठली टीम कुठल्या क्रमांकावर Description: World Cup 2019 Points Table: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी अतिशय अटीतटीची मॅच झाली. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. पाहा या मॅचनंतर वर्ल्ड कप पॉईंट्स टेबल...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola