World Cup 2019: पाकिस्तानच्या न्यूझीलंडवरील विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये चुरस 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 27, 2019 | 02:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019: पाकिस्तानने न्यूझीलंडला नमवत २ गुणांची कमाई केली आहे. यामुळे पॉईंट्स टेबल देखील खूपच रंजक झालं आहे. पाहा नेमकं कसं आहे पॉईंट्स टेबलं. 

babar_azam_AP
पाकिस्तानच्या न्यूझीलंडवरील विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये चुरस   |  फोटो सौजन्य: AP

लंडन: विश्वचषक २०१९ स्पर्धेत पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. सुरुवातीच्याच काही सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत आपलं आव्हान कायम राखलं आहे. कारण पाकिस्तानने द. आफ्रिकेपाठोपाठ न्यूझीलंडलाही पराभूत करत दोन महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या खात्यात ७ गुण जमा आहेत. या विजयामुळे पाईंट्स टेबलमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कारण चौथ्या स्थानी कोणता संघ येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण इंग्लंडकडे आठ गुण जरी असले तरी त्यांचे पुढील फारसे सोपे नाहीत. या सामन्यांमध्ये जर त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर पाकिस्तान, बांगलादेश आण श्रीलंका या तीनही संघापैकी एका संघाला उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळू शकते. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही संघाचे सात-सात गुण आहेत.  

पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेश पाचव्या आणि पाकिस्तान ६ क्रमांकावर आहेत. दोन्ही संघानी सात सामन्यात तीन विजय मिळवत सात गुणांची कमाई केली असली तरीही नेट रनरेटच्या आधारावर बांगलादेश सध्या पाकिस्तानच्या पुढे आहे. पण पुढील दोन्ही सामने जिंकून पाकिस्तान उपांत्य फेरीत धडक मारू शकते. तर बांगलादेश देखील उर्वरित दोन्ही सामन्यात आपली करामत दाखवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देऊ शकते. त्यामुळे आता चौथ्या स्थानासाठी नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. 

पाकिस्तानकडून न्यूझीलंडला पराभव जरी स्वीकारावा लागला असला तरीही न्यूझीलंड ११ गुणांसह दुसऱ्याच स्थानी कायम आहे. तर त्यांच्या खालोखाल भारत आणि इंग्लंडचे संघ आहेत. अशावेळी पाकिस्तान आणि बांगलादेश पुढील सामन्यासाठी त्वेषाने लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय होतं हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: पाकिस्तानच्या न्यूझीलंडवरील विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये चुरस  Description: World Cup 2019: पाकिस्तानने न्यूझीलंडला नमवत २ गुणांची कमाई केली आहे. यामुळे पॉईंट्स टेबल देखील खूपच रंजक झालं आहे. पाहा नेमकं कसं आहे पॉईंट्स टेबलं. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola