World Cup 2019: बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, पाहा पॉईंट्स टेबलमध्ये काय झाले बदल

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 17, 2019 | 23:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup Points Table: बांगलादेशच्या टीमने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव केला आहे. वेस्ट इंडिजच्या टीमचा पराभव झाल्यावर पॉईंट्स टेबलमध्ये कुठली टीम कुठल्या क्रमांकावर आहे पाहूयात...

cricket world cup 2019 points table
बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर विजय (फोटो सौजन्य: @cricketworldcup)  |  फोटो सौजन्य: Twitter

टाँटन: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 23वी मॅच वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात झाली. ही मॅच खूपच रंगतदार झाली कारण, बांगलादेशच्या टीमने धडाकेबाज बॅटिंग करत वेस्ट इंडिजच्या टीमवर दणदणीत विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने 321 रन्स पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या बांगलादेशच्या टीमने हे आव्हान अवघ्या 41.3 ओव्हर्समध्येच गाठलं आणि विजय मिळवला. 

मॅचच्या सुरुवातीला बांगलादेशच्या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन क्रिस गेल हा शून्यावर आऊट झाला आणि त्यांना पहिलाच मोठा झटका बसला. त्यानंतर टीमने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 321 रन्स केले. वेस्ट इंडिजच्या टीमने दिलेलं हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या टीमची सुरूवातच जबरदस्त झाली. बांगलादेशच्या टीमकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक रन्स केले. शाकिब अल हसन याने नॉट आऊट 124 रन्सचे खेळी खेळली. यामध्ये 16 फोरचा समावेश आहे. लिटन दास याने नॉट आऊट 94 रन्स केले. तमीम इकबाल याने 48 रन्स, सौम्य सरकार याने 29 रन्स केले. अशा प्रकारे बांगलादेशच्या टीमने वेस्ट इंडिजच्या टीमवर अगदी सहज विजय मिळवला.

वर्ल्ड कप 2019 मधील पॉईंट्स टेबलमध्ये 8 पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सात-सात पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि टीम इंडिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडची टीम चौथ्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश मॅचनंतर पॉईंट्स टेबल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, पाहा पॉईंट्स टेबलमध्ये काय झाले बदल Description: World Cup Points Table: बांगलादेशच्या टीमने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव केला आहे. वेस्ट इंडिजच्या टीमचा पराभव झाल्यावर पॉईंट्स टेबलमध्ये कुठली टीम कुठल्या क्रमांकावर आहे पाहूयात...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola