World Cup 2019: रोहित-राहुलच्या जोडीने तोडला २३ वर्षे जुना रेकॉर्ड

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 16, 2019 | 17:46 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीसाठी उतरलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या जोडीने २३ वर्षे जुना रेकॉर्ड आपल्या नावे केला.

lokesh and rohit
लोकेश आणि रोहित  |  फोटो सौजन्य: AP

मँचेस्टर: भारत आणि पाकिस्तान यांच्यात मँचेस्टर येथे खेळवल्या जात असेलल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या डावाची सुरूवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल उतरले होते. दोघांनी डावाची सुरूवात सावधपणे केली आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. यानंतर दोघांनी धावगती वाढवताना १० ओव्हरमध्ये संघाला अर्धशतकी मजल गाठून दिली. यानंतर रोहितने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.  

दोघांनी यानंतर चांगली फलंदाजी करत ९८ धावांत शतकी भागीदारी पूर्ण केली. याआधी रोहित आणि राहुलच्या जोडीने जसा ९०चा आकडा पार केला तसे दोघांनी पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारीचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. याआधी हा रेकॉर्ड नवज्योत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर जोडीच्या नावावर होता. दोघांमध्ये १९९६मध्ये बंगळुरू येथे खेळवण्यात आलेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली होती. 

मँचेस्टरमध्ये रोहित आणि राहुल यांच्यात २४ ओव्हरमध्ये १३६ धावांची भागीदारी झाली. वहाब रियाझने शॉर्ट कव्हरवर बाबर आझमच्या हातून लोकेश राहुलला बाद केले. राहुलने ७८ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. 

पाकिस्तानविरुद्ध सगळ्यात मोठी भागीदारी

रोहित आणि राहुल यांच्यात झालेली १३६ धावांची भागीदारी ही पाकिस्तानविरुद्ध भारताने वर्ल्डकपमध्ये केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे. याआधी हा रेकॉर्ड विराट कोहली आणि शिखर धवनच्या नावावर होता. दोघांनी २०१५मध्ये अॅडलेडमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली होती. 

भारताकडून पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमधील शतकी भागीदारी

मोहम्मद कैफ- सचिन तेंडुलकर सेंच्युरियन  २००३
शिखर धवन -विराट कोहली एमसीजी  २०१५
लोकेश राहुल - रोहित शर्मा मँचेस्टर २०१९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: रोहित-राहुलच्या जोडीने तोडला २३ वर्षे जुना रेकॉर्ड Description: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीसाठी उतरलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या जोडीने २३ वर्षे जुना रेकॉर्ड आपल्या नावे केला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola