ICC World Cup 2019: 'हा' दिग्गज खेळाडू क्रिकेट समितीवर नाराज, २०१९ वर्ल्ड कपची ऑफर नाकारली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 27, 2019 | 18:04 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ICC Cricket World Cup 2019: वर्ल्डकप २०१९ ची दमदार सुरूवात व्हायला आता अवघे ३ दिवस उरले आहेत. अशातच २०११ च्या वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये सेंच्युरी करण्याऱ्या खेळाडूनं २०१९ वर्ल्डकपची एक ऑफर नाकारलीय. जाणून घ्या...

Mahela Jaywardene
या खेळाडूनं ऑफरली वर्ल्डकपमधील ही ऑफर  |  फोटो सौजन्य: AP, File Image

कोलंबो: श्रीलंकन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेला जयवर्धनेनं वर्ल्डकप २०१९ साठी आपल्या देशाच्या टीम सोबत जोडण्यास नकार दिलाय. त्यानं श्रीलंकन क्रिकेट टीमसोबत विशेष भूमिका सांभाळण्याची ऑफर नाकारली आहे. याबाबत बोलताना जयवर्धनेनं सांगितलं की, त्यांच्या देशात क्रिकेटची जी परिस्थिती आहे, त्यामुळे श्रीलंकन क्रिकेटपासून तो अतिशय निराश झालेला आहे. क्रिकइंफो या वेबसाईटसोबत बोलतांना जयवर्धनेनं सांगितलं, ‘मला वर्ल्ड कपसाठी श्रीलंकन टीमसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती, मात्र त्यापेक्षा अधिक गरजेचे कामं मी सध्या करतोय. माझ्याकडून ज्या कामाची अपेक्षा श्रीलंकन क्रिकेट समितीनं केली. ते काम मला कळलेलं नाही. त्यामुळे मी ते करण्यास नकार दिलाय.’ 

यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाचं मार्गदर्शन करणारा मुंबई इंडियन्सचा कोच महेला जयवर्धने सध्या श्रीलंकन क्रिकेट समितीवर नाराज दिसतोय. कारण, गेल्यावर्षी महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि अरविंद डी सिल्वा यांच्या समितीनं श्रीलंकन क्रिकेटबाबत एक रिपोर्ट तयार केला होता. यात त्यांनी काही बदल सुचवले होते. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डानं त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष केलं.

ऑफरबद्दल बोलतांना जयवर्धनेनं पुढे सांगितलं की, ‘वर्ल्ड कपसाठीच्या टीमची निवड झालेली आहे आणि आता सगळं काही संपलं आहे. माझ्याजवळ आता काही टीमसाठी करण्यासारखं नाहीय. मी टीमच्या व्यवस्थापनात लहान भूमिका निभावून आनंदी आहे. मला अजून काही जास्त मिळविण्याचा लोभ नाहीय. माझ्यासाठी ती जागा चांगली नाही, मी तिथं काम करणार नाही.’

महेला जयवर्धनेनं पुढे स्पष्ट केलं, ‘आम्ही आठ महिने सतत काम करून व्यावसायिक क्रिकेटचं फ्रेमवर्क तयार केलं होतं. आम्ही श्रीलंकन क्रिकेटला त्यानुसार काम करण्यास सांगितलं, पण त्यांनी आमचा रिपोर्ट मान्य केला नाही. आम्ही हे फ्रेमवर्क आपल्या खेळाडूंना वाचविण्यासाठी केलं होतं. जे खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या धर्तीवर क्रिकेट खेळलेले आहेत, त्यांच्या अनुभवाची टीममध्ये खूप गरज होती.’

आमच्या प्रथम श्रेणीतील क्रिकेट टीममध्ये काही असे खेळाडू आहे, ज्यांचं वय २५ वर्ष आहे आणि ते निराशाजनक काम करतायेत. त्यांना वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होतो, तेव्हा सीनिअर्सकडून मार्गदर्शन घेत होतो. मात्र आता आम्ही सीनिअर खेळाडूंशिवाय चांगली टीम बनवू शकत नाही, असंही जयवर्धने पुढे म्हणाला. 

जयवर्धनेनं एंजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमलवर केली टीका

श्रीलंकन टीमचा माजी कॅप्टन महेला जयवर्धनेनं एंजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमलच्या कॅप्टन्सीवर टीका केली. २०१५ मध्ये जयवर्धनेच्या रिटायर्डमेंटनंतर एंजेलो मॅथ्यूज टीमचा कॅप्टन झाला होता. मात्र त्यानं हिरीरीनं कॅप्टन्सी न सांभळाता काही निर्णय चुकीचे घेतले, असं जयवर्धने म्हणतो. टीमची धुरा मॅथ्यूज सोबतच चंडीमल,थिसारा परेरा, लसिथ मलिंगा, चमारा कपूगेदरा आणि सर्वात नवीन खेळाडू असलेल्या दिमुथ करुणारत्‍नेनं सांभाळली होती. जयवर्धने म्हणतो, ‘मी आणि संगकारानं मॅथ्यूजला फक्त एव्हढं म्हटलं होतं की, त्यानं क्रिकेटच्या राजकारणाचा त्रास करून न घेता आपल्या कॅप्टन्सीकडे लक्ष द्यावं. मात्र त्यानं क्रिकेट राजकारणासमोर पराभव स्वीकारला आणि इतर खेळाडूंना निर्णय घेऊ दिले. जर मॅथ्यूजनं कॅप्टन्सी सोडली नसती, तर टीमची आज ही अवस्था नसती’. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ICC World Cup 2019: 'हा' दिग्गज खेळाडू क्रिकेट समितीवर नाराज, २०१९ वर्ल्ड कपची ऑफर नाकारली Description: ICC Cricket World Cup 2019: वर्ल्डकप २०१९ ची दमदार सुरूवात व्हायला आता अवघे ३ दिवस उरले आहेत. अशातच २०११ च्या वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये सेंच्युरी करण्याऱ्या खेळाडूनं २०१९ वर्ल्डकपची एक ऑफर नाकारलीय. जाणून घ्या...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola