Cricket World Cup 2019: विश्वचषकासाठी ८ संघ जाहीर, पाहा कोणत्या संघात कोणता खेळाडू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 19, 2019 | 11:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cricket World Cup 2019: इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी १० पैकी ८ देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. पाहूयात कोणत्या देशाने आपल्या कोणत्या-कोणत्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.

Cricket_World Cup_ians
विश्वचषकासाठी ८ संघ जाहीर  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई: आयसीसी विश्वचषक २०१९ ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणार आहे. यासाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी केली आहे. सध्या भारतात आयपीएलचा माहौल असला तरी आता क्रिकेट विश्वचषकातील संघ आणि त्यासंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत. क्रिकेट विश्वचषकात सहभागी होणाऱ्या जवळपास सर्व देशांच्या निवड समितीने आपलआपले संघ जाहीर केले आहेत. याची सुरूवात न्यूझीलंडने केली होती. विश्वषकात एकूण १० संघ सहभागी होणार असून यापैकी ८ देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. तर उर्वरित दोन देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. प्रत्येक संघाने आपला १५ जणांचा चमू काही दिवसांपूर्वीच जाहीर केला आहे. 

या सर्व संघापैकी यजमान इंग्लंड हा एक असा संघ आहे की, ज्याने फक्त आपला प्रारंभिक संघच जाहीर केला आहे. त्याचं कारण म्हणजे विश्वचषकाच्या आधी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये वनडे मालिका खेळविण्यात येणार आहे. यामुळे इंग्लंड पुन्हा एकदा आपल्या खेळाडूंची कामगिरी पाहून गरज पडल्यास अंतिम बदल करू शकतं. आठ देशांच्या संघाच्या घोषणेनंतर आता फक्त अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिज या संघांचीच घोषणा बाकी आहे. 

एक नजर ८ देशातील विश्वचषक संघांवर: 

  1. भारत विश्वचषक संघ: विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, केएल राहुल, मोहम्मद शमी, विजय शंकर, रोहित शर्मा आणि कुलदीप यादव.
  2. इंग्लंड विश्वचषक संघ (प्रारंभिक): इयॉन मोर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), जोस बटलर (विकेटकीपर), टॉम कर्रन, जो डेनली, एलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेविड विल्ली, क्रिस वोक्स आणि मार्क वूड.
  3. न्यूझीलंड विश्वचषक संघ: केन विलियमसन (कर्णधार) टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्गसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लेथम (विकेटकीपर), कॉलिन मुन्रो, जिमी निशम, हेन्री निकोल्स, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउथी आणि रॉस टेलर.
  4. दक्षिण आफ्रिका विश्वचषक संघ: फॉफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जेपी डुमिनी, एइडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनिच नॉर्टे, एंडिले फेहलुकवायो, ड्वाइन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, डेल स्टेन, इमरान ताहिर आणि वॅन डेर डूसन.
  5. ऑस्ट्रेलिया विश्वचषक संघ: एरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, एलेक्स केरी (विकेटकीपर), नॅथन कूल्टर-नाइल, पॅट कमिंस, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झे रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झाम्पा
  6. पाकिस्तान विश्वचषक संघ: सरफराज अहमद (कर्णधार), इमाम उल हक, आबिद अली, जुनैद खान, बाबर आजम, मोहम्मद हफीज, फहीम अशरफ, मोहम्मद हुसैन, फखर जमान, शादाब खान, हारिस सोहेल, शाहीन आफ्रिदी हसन अली, शोएब मलिक आणि इमाद वसीम.
  7. बांग्लादेश विश्वचषक संघ: मशरफे मुर्तजा (कर्णधार), अबू जैद, लिटन दास (विकेटकीपर), महमुदुल्लाह, मेंहदी हसन, मोहम्मद मिथुन (विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्देक हुसैन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मुस्ताफिजुर रहमान, रूबेल हुसैन, सब्बीर रहमान, सौम्या सरकार आणि तमीम इकबाल.
  8. श्रीलंका विश्वचषक संघ : दिमुथे करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, एंजेलो मॅथ्यूज, जीवन मेंडिस, कुशल मेंडिस (विकेटकीपर), कुशल परेरा (विकेटकीपर), थिसारा परेरा, नुवान प्रदीप, धनंजय डी सिल्वा, मिलिंडा सिरीवर्धना, लहिरु थिरिमन्ने, इसुरु उदाना आणि जेफरी वांडरसे.

या आठ संघाव्यतिरिक्त फक्त वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तान यांचेच संघ जाहीर होणं बाकी आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघांवर सर्वांची नजर असणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वेस्टइंडिजने आपल्या अनेक स्टार खेळाडूंशिवाय झालेल्या वनडे मालिकेत इंग्लंडला बरंच हैराण केलं होतं. त्यामुळे वेस्टइंडिजचा संघ हा विश्वचषकात अतिशय धोकादायक ठरू शकतो. 

२३ एप्रिलला वेस्टइंडिज आपल्या संघाची घोषणा करू शकतो. अशावेळी सर्वांच्या नजरा या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या आंद्रे रसलवर असणार आहेत. रसलला संघात स्थान मिळत की नाही यावर आतापासूनच चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या विश्वचषकात सर्व मॅच या राऊंड रॉबिन फॉर्मेटनुसार खेळविण्यात येणार आहेत. या फॉर्मेटमध्ये सर्व १० संघ एकमेकांसोबत किमान एक वेळा खेळणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cricket World Cup 2019: विश्वचषकासाठी ८ संघ जाहीर, पाहा कोणत्या संघात कोणता खेळाडू Description: Cricket World Cup 2019: इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी १० पैकी ८ देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. पाहूयात कोणत्या देशाने आपल्या कोणत्या-कोणत्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.
Loading...
Loading...
Loading...