वर्ल्डकपमधून बाहेर पडलेली टीम इंडिया आता काय करणार? मिळाली मोठी अपडेट

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 12, 2019 | 16:20 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

विराट कोहलीने सांगितले की महेंद्रसिंग धोनीने आपल्या भविष्यातील योजनांबाबत टीम सदस्यांना काहीच सांगितलेले नाही आहे. असं म्हटलं जातय की भारतात परतल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो.

team india
टीम इंडिया 

थोडं पण कामाचं

  • वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियाचा प्लान
  • ३ ऑगस्टपासून टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर
  • वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव

लंडन: टीम इंडियाचे यंदाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला ८ विकेटनी पराभव सहन करावा लागला. टीम इंडियाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली मात्र सेमीफायनलच्या सामन्यात त्यांची कामगिरी चांगली झाली नाही आणि त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचा शेवट निराशाजनक झाला. त्यामुळे आता वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे खेळाडू काय करणार आहे असा सवाल केला जात आहे. 

टीम इंडिया आता वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. याची सुरूवात ३ ऑगस्टला होणार आहे. याआधी सर्व खेळाडू विविध दिशेला निघणार आहे. याचाच अर्थ सात आठवडे जीवतोड मेहनत केल्यानंतर भारतीय क्रिकेटर काही वेळ ब्रेक घेणार आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार येथून लॉजिस्टिक मॅनेजर जबाबदारी सांभाळणार आहेत. आता खेळाडू वेगवेगळ्या बॅचमध्ये अथवा ग्रुपमध्ये आपापल्या ठिकाणी जातील. तिकीट कसे उपलब्ध होतात यावर ते अवलंबून आहे. 

काही खेळाडू घरी परतण्याबाबत विचार करत आहे तर काही खेळाडू आणखी काही वेळ इंग्लंडमध्ये व्यतीत करू शकतात अथवा दोन ते तीन आठवडे ब्रेक घेऊन कुठे फिरायला जाऊ शकतात. या दरम्यान सर्वाधिक चर्चा होतेय ती महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत. वर्ल्डकपच्या नॅशनल जर्सीमध्ये त्याची ही शेवटची स्पर्धा आहे. मिळालेल्या माहितीनुसार धोनी सर्वात आधी आपल्या घरी रांचीला परतणार आहे आणि काही दिवसांमध्ये तो निवृत्तीची घोषणा करू शकतो. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव झाल्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले होते की धोनीने त्याच्या भविष्यातील योजनांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र अशी माहिती मिळत आहे की ३८ वर्षीय अनुभवी विकेटकीपर घरी परतल्यानंतर क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो. 

भारतीय संघाचे क्रिकेटर २० मेपासून एकत्र आबेत. २१ मेला भारतीय संघ वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना झाला होता. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरूवात ३ ऑगस्टला होत आहे. भारतीय संघ ३ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान तीन टी-२० सामने खेळणार आहे. यातील दोन सामने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळवले जातील. यानंतर ८ ते १४ ऑगस्टदरम्यान तीन वनडे सामन्यांची सीरिज खेळवली जाईल. त्यानंतर २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजचा या मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनि निवृत्ती घेईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वर्ल्डकपमधून बाहेर पडलेली टीम इंडिया आता काय करणार? मिळाली मोठी अपडेट Description: विराट कोहलीने सांगितले की महेंद्रसिंग धोनीने आपल्या भविष्यातील योजनांबाबत टीम सदस्यांना काहीच सांगितलेले नाही आहे. असं म्हटलं जातय की भारतात परतल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola