अखेर विराट कोहलीनं सांगितलं रिषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकच्या निवडीचं कारण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 16, 2019 | 15:59 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

विराट कोहलीनं वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात रिषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकची निवड करण्याचं कारण सांगितलं आहे. दिनेश कार्तिकची टीम इंडियात दुसरा विकेट किपर म्हणून निवड केली गेलीय. जाणून घ्या काय म्हणाला विराट.

Dinesh Karthik and Rishabha Pant
रिषभच्या जागी दिनेशच्या निवडीमागचं कारण सांगतोय विराट  |  फोटो सौजन्य: AP, File Image

मुंबई: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये होतेय. १२व्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची १ महिन्यापूर्वीच निवड करण्यात आली. मात्र या टीममध्ये जागा न मिळाल्यानं क्रिकेटपटू रिषभ पंतनं नाराजी व्यक्त केली होती. त्या विषयावर नंतर बरीच चर्चाही झाली. रिषभनं यंदा आयपीएलच्या १२ व्या सिझनमध्ये दिल्लीच्या टीमकडून चांगलं प्रदर्शन केलं होतं. मात्र तरीही त्याची टीम इंडियात निवड झाली नाही. टीमच्या घोषणेनंतर मुख्य निवडकर्ते प्रसाद यांनी आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र आता या प्रकरणावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं स्पष्टीकरण दिलंय.

विराट कोहलीनं वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिकला घेण्यासंदर्भात काही कारणं दिली आहेत. जाणून घ्या ही कारणं.

  1. दबावाच्या वेळी शांतपणे खेळण्याची क्षमता : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं सांगितलं, कार्तिक दबावामध्ये सुद्धा शांततेत खेळू शकतो. हेच मुख्य कारण आहे की दुसरा विकेटकिपर म्हणून निवड करताना रिषभ पंतला त्यानं मागे टाकलं.
  2. फिनिशरची भूमिका निभावू शकतो : विराट कोहलीचं म्हणणं आहे की, दिनेश कार्तिक मॅचच्या अखेरच्या काळात फास्ट रन्स बनवण्यासोबत फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो. कार्तिकनं निदहास ट्रॉफीच्या फायनल मॅचमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर मॅच फिनिशर म्हणून विश्वास वाढला आहे.
  3. अनुभव : दिशेन कार्तिकनं २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. त्याच्याजवळ जवळपास दोन दशकांचा क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. त्यानं टीम इंडियासाठी आतापर्यंत ९१ वनडे मॅच खेळल्या आहेत. दिनेश कार्तिकचा इंग्लंडच्या जमिनीवर वनडे क्रिकेट खेळण्याचाही अनुभव चांगला आहे. त्यामुळंच त्याचा अनुभव टीमसाठी उपयोगी पडेल.
  4. धोनीच्या गैरहजरीत महत्त्वाचा असेल : विराट कोहलीनं पुढे सांगितलं, देव न करो पण जर कुठल्याही कारणानं एम. एस. धोनी मैदानावर नसेल तर तेव्हा कार्तिकची विकेटच्या मागची भूमिका खूप महत्त्वाची असेल.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल सिझन १२ मध्ये रिषभ पंतच्या खेळीची तुलना कार्तिक सोबत केली गेली. यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये दिनेश कार्तिकची दमदार खेळी बघायला मिळाली नाही. जिथं पंतनं १६ मॅचमध्ये 37.53 च्या सरासरीनं ४८८ रन्स केले. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन असलेल्या दिनेश कार्तिकनं १४ मॅचमध्ये ३१.६२ च्या सरासरीनं फक्त २५३ रन्स केलेत. मात्र जसा सिझन संपायला आला तशी कार्तिकला त्याच्या खेळाची लय सापडली. यादरम्यान त्यानं एक ९७ रन्सची दमदार इनिंग खेळली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अखेर विराट कोहलीनं सांगितलं रिषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकच्या निवडीचं कारण Description: विराट कोहलीनं वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात रिषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकची निवड करण्याचं कारण सांगितलं आहे. दिनेश कार्तिकची टीम इंडियात दुसरा विकेट किपर म्हणून निवड केली गेलीय. जाणून घ्या काय म्हणाला विराट.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola