वर्ल्डकपच्या फायनलमधील ओव्हर थ्रो वाद, आयसीसीने सोडले मौन, दिले हे उत्तर

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 16, 2019 | 17:19 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडला ओव्हर थ्रोचे ६ रन्स देण्यात आले. यानंतर वाद सुरू झाला की इंग्लंडला ६ नव्हे तर ५ रन्स द्यायला हवे होते. आता या प्रकरणात आयसीसीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ben stokes
बेन स्टोक्स 

थोडं पण कामाचं

  • इंग्लंड वि न्यूझीलंड सामन्यातील वाद
  • फायनलमध्येओव्हर थ्रो वरून वाद
  • इंग्लंडला ६ ऐवजी ५ धावा द्यायला हव्या होत्या

मुंबई: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९च्या फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला हरवत वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले. मात्र फायनल संपल्यानंतर आता अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ओव्हर थ्रोवरून सुरू झालेले वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. फायनलमध्ये त्यावेळेस ड्रामा बघायला मिळाला जेव्हा डीप-मिडविकेटवर उभ्या असलेल्या मार्टिन गप्टिलचा एक थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून बाऊंड्री पार गेला. यावेळी अंपायरने इंग्लंडला ६ धावा दिल्या. दरम्यान, आता हा वाद सुरू झाला आहे की इंग्लंडला ६ नव्हे ५ धावा द्यायल्या हव्या होत्या. आता या प्रकरणात आयसीसीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ने रविवारी लॉर्डच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्डकप २०१९ च्या फायनल सामन्यादरम्यान वादग्रस्त थ्रो बाबत बोलण्यास नकार दिला. आयसीसीच्या १९.८ नियमांनुसार ओव्हर थ्रोच्या विषयामध्ये असे वाटते इंग्लंडने घेतलेली दुसरी धाव मोजण्यात घेतली नाही पाहिजे. जिथे इंग्लंडला ६ धावा देण्यात आल्या तेथे इंग्लंडला ५ धावा दिल्या गेल्या पाहिजे होत्या. जर इंग्लंडला त्यावेळी ५ धावा दिल्या गेल्या असत्या तर स्ट्राईकवर बेन स्टोक्स नव्हे तर आदिल रशीद असता आणि इंग्लंडला तेव्हा जिंकण्यासाठी २ बॉलमध्ये ४ धावांची आवश्यकता होती. 

आयसीसीच्या नियमांनुसार, जर ओव्हर थ्रो दरम्यान बॉल बाऊंड्री पार जातो तेव्हा फलंदाजाने पूर्ण केलेल्या धावा दिल्या जातात. दरम्यान यावेळेस ही बाबही लक्षात घेतली पाहिजे की गोलंदाजाने थ्रो करण्याआधी एकमेकांना क्रॉस करणे गरजेचे असते तेव्हा ती धाव ग्राह्य धरली जाते. जर थ्रो करण्याआधी फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केले नाही तर ती धाव ग्राह्य धरू नये.

दरम्यान, ऑल फिल्ड अंपायर कुमार धर्मसेना यांनी आपल्या सहकारी अंपायरसोबत विचार विनिमय करून इंग्लंडला ६ धावा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा आयसीसीला याबाबत प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. आयसीसीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंपायर नियमांच्या व्याख्यांनुसार मैदानावर निर्णय घेतात आणि आम्हाला कोणत्याही निर्णयावर विधान करावयाचे नाही. 

इंग्लंडला ओव्हर थ्रोवर ६ नाही तर ५ धावा द्यायल्या हव्या होत्या याचा खुलासा माजी आंतरराष्ट्रीय अंपायर आणि सर्वोत्कृष्ट अंपायरचा पुरस्कार जिंकलेले सायमन टॉफेल यांनी दिले. फॉक्स स्पोर्ट्स ऑस्ट्रेलियाने टाफेल यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ही एक चूक आहे. निर्णय घेण्यात चूक झाली. इंग्लंडला ६ ऐवजी ५ धावा दिल्या गेल्या पाहिजे होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
वर्ल्डकपच्या फायनलमधील ओव्हर थ्रो वाद, आयसीसीने सोडले मौन, दिले हे उत्तर Description: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडला ओव्हर थ्रोचे ६ रन्स देण्यात आले. यानंतर वाद सुरू झाला की इंग्लंडला ६ नव्हे तर ५ रन्स द्यायला हवे होते. आता या प्रकरणात आयसीसीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...