ICC World Cup 2019: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानचे 'हे' खेळाडू रिंगणात

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 18, 2019 | 23:34 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Pakistan Cricket team for World Cup: इंजमाम उल हक याच्या नेत्रृत्वात निवड समितीने गुरूवारी आगामी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमची घोषणा केली. पाहूयात कुणाला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

Pakistan Cricket Team
पाकिस्तान क्रिकेट टीम (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: AP

कराची: इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. इंजमाम उल हकच्या नेत्रृत्वाखाली पाकिस्तानच्या निवड समितीने १५ सदस्यीय टीमची घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेट टीमची धूरा सरफराज अहमद याच्यावर सोपवण्यात आली आहे. टीममध्ये अनुभवी आणि तरुण खेळाडूंना बरोबरची संधी देण्यात आली आहे. मोहम्मद आमिर याला टीममधून डच्चू देण्यात आला आहे.

यासोबतच निवड समितीने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या आगामी पाच मॅचेसच्या वन-डे सीरिजसाठी १७ सदस्यांच्या टीमची निवड केली आहे. प्रमुख प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सर्वात फिट खेळाडूंची निवड करण्याचं यापूर्वी म्हटलं होतं. निवड समितीने हेच लक्षात ठेवून वर्ल्ड कपसाठी १५ सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. ही टीम सर्वोत्तम असल्याचं निवड समितीने म्हटलं आहे.

२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर पाकिस्तानचं वन-डे क्रिकेटमधील प्रदर्शन चांगलं राहीलेलं नाहीये. नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये पाकिस्तानचा ०-५ असा लाजीरवाणा पराभव झाला होता. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा २-३ ने पराभव केला होता. न्यूझीलंड सोबतची सीरिज १-१ ने बरोबरीत राहीली. तर, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानची टीम क्वॉलिफाय करु शकली नव्हती.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम 

सरफराज अहमद (कॅप्टन), इमाम उल हक, आबिद अली, जुनैद खान, बाबर आझम, मोहम्मद हफीज, फहीम अशरफ, मोहम्मद हुसैन, फखर जमान, शादाब खान, हारिस सोहेल, शाहीन फरीदी, हसन अली, शोएब मलिक, इमाद वसीम.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ICC World Cup 2019: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानचे 'हे' खेळाडू रिंगणात Description: Pakistan Cricket team for World Cup: इंजमाम उल हक याच्या नेत्रृत्वात निवड समितीने गुरूवारी आगामी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमची घोषणा केली. पाहूयात कुणाला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
Loading...
Loading...
Loading...