दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द, पण 'या' खेळाडूने बनवला नवा रेकॉर्ड

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 12:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

World Cup 2019: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 15वी मॅच पावसामुळे रद्द झाली. मात्र, या मॅचच्या 7.3 ओव्हर्समध्येच एका खेळाडूने आपल्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला आहे. पाहा कोण आहे हा खेळाडू आणि रेकॉर्ड.

chris gayle record most catches in west indies team
cricketworldcup.com video screen grab 

मुंबई: दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज यांच्यात वर्ल्ड कप 2019 मधील 15 वी मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. मॅच रद्द झाल्याने दोन्ही टीमला प्रत्येकी एक-एक पॉईंट्स देण्यात आले. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच सुरू होताच वेस्ट इंडिजच्या टीमने दक्षिण आफ्रिकेच्या दोन बॅट्समनला माघारी सुद्धा धाडलं. त्यामुळे वेस्ट इंडिजची टीम चांगलीच खूश होती पण आठवी ओव्हर सुरू असतानाच पावसाचा व्यत्यय आला. 7.3 ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने दोन विकेट्स गमावत 29 रन्स केले होते. पण पावसामुळे खेळ थांबला. मात्र, त्यापूर्वी वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

गेलच्या नावावर रेकॉर्ड 

क्रिस गेल याने शेल्डन कॉट्रेल याच्या बॉलिंगवर दक्षिण आफ्रिकेचा ओपनर बॅट्समन हाशिम अमला याला कॅच आऊट केलं. ही कॅच पकडताच क्रिस गेल याने आपल्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड नोंदवला आहे. आता वेस्ट इंडिजच्या वन-डे क्रिकेट टीममध्ये सर्वाधिक कॅच पकडणारा खेळाडू हा क्रिस गेल बनला आहे. ही कॅच पकडताच क्रिस गेल याच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये 121 कॅच नोंदवल्या गेल्या आहेत.

गेलने दिग्गजांना टाकलं मागे

सर्वाधिक कॅच पकडणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंपैकी माजी कॅप्टन कार्ल हूपर आणि ब्रायन लारा यांनाही गेलने मागे टाकले आहे. माजी कॅप्टन कार्ल हूपर याच्या नावावर 120 कॅचेसची नोंद आहे. तर ब्रायन लारा याच्या नावावर 117 कॅचेस आहेत. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन असलेल्या क्रिस गेल याच्या नावावर क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड्सची नोंद आहे. त्यात आता वेस्ट इंडिज क्रिकेट टीममधील सर्वाधिक कॅचेसचा रेकॉर्डही क्रिस गेलच्या नावावर नोंदवला गेला आहे. 

मॅच रद्द झाल्याचा असाही फायदा

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाली आणि दोन्ही टीमला प्रत्येकी एक-एक पॉईंट देण्यात आले. वेस्ट इंडिजच्या टीमचे आतापर्यंत तीन मॅचेसमध्ये तीन पॉईंट्स झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या टीमने आता श्रीलंका आणि पाकिस्तान या टीम्सला मागे टाकत पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 4 मॅचेसपैकी तीनमध्ये पराभव आणि एक मॅच टाय झाल्याने अवघा एकच पॉईंट मिळवता आला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेची टीम पॉईंट्स टेबलमध्ये 9व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द, पण 'या' खेळाडूने बनवला नवा रेकॉर्ड Description: World Cup 2019: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 15वी मॅच पावसामुळे रद्द झाली. मात्र, या मॅचच्या 7.3 ओव्हर्समध्येच एका खेळाडूने आपल्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला आहे. पाहा कोण आहे हा खेळाडू आणि रेकॉर्ड.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola