तोच महिना, तिच टीम, तेच मैदान, 20 वर्षांपूर्वी टीम इंडियासोबत घडलं होतं असं काही...

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 13, 2019 | 10:54 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सध्या न्यूझीलंडची टीम खूपच चांगल्या फॉर्मात आहे. याच न्यूझीलंडसोबत आज टीम इंडियाचा सामना ज्या मैदानावर होत आहे. त्याच मैदानात टीम इंडियासोबत 20 वर्षांपूर्वी असं काही घडलं होतं की...

India vs New Zealand
India vs New Zealand  |  फोटो सौजन्य: Twitter

IND vs NZ: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये गुरुवारी अशा दोन टीममध्ये सामना होत आहे ज्यांनी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅचमध्ये पराभव पाहिला नाहीये. वर्ल्ड कपमधील 18वी मॅच टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळली जात आहे. या मॅचमध्ये जिंकणारी टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहे. टीम इंडियासाठी या मॅचमध्ये विजय मिळवणं तितकं सोपं नाहीये कारण न्यूझीलंडची टीम सध्या खूपच चांगल्या फॉर्मात आहे. तसेच ज्या मैदानात मॅच होत आहे त्या मैदानातील टीम इंडियाचा परफॉर्मन्स चांगला राहीलेला नाहीये.

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानात मॅच होत आहे. याच मैदानात 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या टीमची मॅच 12 जून रोजी झाली होती. यावेळी दोन्ही टीम्समध्ये 13 जून रोजी मॅच होत आहे. त्यावेळी मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या नेत्रृत्वात टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावर 251 रन्स बनवले होते. त्यामध्ये अजय जडेजाने 76 रन्सची इनिंग खेळली होती.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेल्या न्यूझीलंडच्या टीमने हे लक्ष्य 48.5 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावत पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या टीमकडून मॅट हॉर्न याने 74 रन्स आणि रोजर टूज याने नॉट आऊट 60 रन्सची इनिंग खेळली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याच मैदानात, वर्ल्ड कपमध्येच आणि त्याच महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 

विराट कोहलीच्या नेत्रृत्वात टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करुन त्या पराभवाचा बदला घेता येणार आहे. टीम इंडियाकडून एखादी चूकही पराभवास कारणीभूत ठरू शकते. न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यात वर्ल्ड कपमधील मॅचेसच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या आकडेवारीत न्यूझीलंडचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियात वर्ल्ड कप दरम्यान एकूण 7 मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी 4 मॅचेसमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे तर टीम इंडियाने 3 मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे.

तर वन-डे मॅचेसची आकडेवारी काही वेगळं सांगते. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 105 वन-डे मॅचेस झाल्या आहेत त्यापैकी भारताने 55 मॅचेस जिंकल्या आहेत आणि न्यूझीलंडने 45 मॅच जिंकल्या आहेत. 1 मॅच टाय झाली आहे तर 5 मॅचेस रद्द झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
तोच महिना, तिच टीम, तेच मैदान, 20 वर्षांपूर्वी टीम इंडियासोबत घडलं होतं असं काही... Description: सध्या न्यूझीलंडची टीम खूपच चांगल्या फॉर्मात आहे. याच न्यूझीलंडसोबत आज टीम इंडियाचा सामना ज्या मैदानावर होत आहे. त्याच मैदानात टीम इंडियासोबत 20 वर्षांपूर्वी असं काही घडलं होतं की...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola