मुंबई: वेस्टइंडीज (West Indies) ला भारताविरुद्ध(india) पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. टीम इंडियाने पहिला सामना ६८ धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजच्या संघाने आधीच वनडे मालिका(one day series) गमावली आहे. आता वेस्ट इंडिजच्या अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. आता आयसीसीने(icc) विंडीजवर एका खास कारणामुळे दंड(fine) ठोठावला आहे. ICC fined for west indies team for slow over rate
अधिक वाचा - अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत? 'हे' असून शकत कारण
वेस्ट इंडिजच्या संघावर शुक्रवारी त्रिनिदादमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात मंद गतीने ओव्हर टाकल्याप्रकरणी सामन्याच्या फीच्या २० टक्के दंड ठोठावला आहे. यासाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन दोषी आढळला. पूरनने आपली चूक मान्य केली आहे.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सामना तुफानी पद्धतीने जिंकला. भारताने विंडीजला जिंकण्यासाठी १९१ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण करू शकली नाही आणि त्यांनी ६८ धावांनी सामना गमावला. भारताकडून दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांनी तुफानी खेळी केली. तर रवीचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या.
टी-२० सामन्यात क्रीझवर उभ्या दिनेश कार्तिकने धडाकेबाज खेळी केली. दिनेश कार्तिक क्रीजवर आहे तोपर्यंत टीम इंडिया चांगली धावसंख्या करेल हे सगळ्यांना माहीत होतं आणि तसंच घडलं. भारतीय संघाने 20 षटकात १९० धावा केल्या यावेळी कार्तिकने १९ बॉलमध्ये ४१ धावा तडकावल्या. दिनेश कार्तिकच्या खेळीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
अधिक वाचा - साहेब! 15 दिवसांची सुट्टी द्या, मला बाप बनायचं आहे
वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. या मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या मालिकेत भारताच्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारताने हा विजय मिळवला.