टी २० वर्ल्डकपचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला २८ जूनपर्यंतची मुदत

टी २० वर्ल्डकप संदर्भात निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला २८ जून २०२१ पर्यंतची मुदत दिली आहे.

ICC Give BCCI 28 June Deadline to Finalise Venue of 2021 T20 WC
टी २० वर्ल्डकपचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला २८ जूनपर्यंतची मुदत 

थोडं पण कामाचं

  • टी २० वर्ल्डकपचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला २८ जूनपर्यंतची मुदत
  • वर्ल्डकप आयोजनाचे ठिकाण आणि वेळापत्रक बीसीसीआय ठरवणार
  • २८ जूनपर्यंत निर्णय होणार

मुंबईः टी २० वर्ल्डकप संदर्भात निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला २८ जून २०२१ पर्यंतची मुदत दिली आहे. आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला भारताच्यावतीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि बीसीसीआयचे सरचिटणीस जय शहा हे उपस्थित होते. त्यांनी बीसीसीआयची बाजू मांडली. यानंतर आयसीसीने टी २० वर्ल्डकपचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला २८ जूनपर्यंतची मुदत दिली. ICC Give BCCI 28 June Deadline to Finalise Venue of 2021 T20 WC

टी २० वर्ल्डकप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये होणे अपेक्षित आहे. पण कोरोना संकटामुळे टी २० वर्ल्डकप आयोजनाशी संबंधित निर्णय रखडले आहेत. बीसीसीआय टी २० वर्ल्डकप ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ दरम्यान भारतात खेळवणार की स्पर्धेचे आयोजन याच कालावधीत यूएईमध्ये करणार आणि यजमानपदाचा मान स्वतःकडेच राखणार की स्पर्धा २०२१ ऐवजी २०२२ दरम्यान भारतात खेळवण्यासाठी नियोजन करणार हे पुढील काही दिवसांत निश्चित होईल. 

याआधी कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएल १४च्या उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये करण्याचा निर्णय बीसीसीआयने शनिवार २९ मे २०२१ रोजी झालेल्या विशेष बैठकीत घेतला. टी २० वर्ल्डकप संदर्भातल्या निर्णयासाठी आयसीसीकडून आणखी एक महिन्याचा वेळ मागून घ्यावा, असे बीसीसीआयने विशेष बैठकीत ठरवले. यानंतर बीसीसीआयच्यावतीने सौरव गांगुली आणि जय शहा यांनी आयसीसीशी चर्चा केली. आयसीसीने बीसीसीआयला निर्णय घेण्यासाठी २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी