भारतातल्या २०२३च्या वर्ल्डकपसाठी मोठा बदल होणार?

भारतात २०२३ मध्ये क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये दहा ऐवजी चौदा किंवा सोळा संघांना खेळवण्याबाबत आयसीसी विचार करत आहे.

icc may include 14 or 16 teams in cricket world cup
भारतातल्या २०२३च्या वर्ल्डकपसाठी मोठा बदल होणार? 

थोडं पण कामाचं

  • भारतातल्या २०२३च्या वर्ल्डकपसाठी मोठा बदल होणार?
  • स्पर्धक संघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
  • आयसीसी तीन वर्ल्डकपसाठी अंतिम निर्णय घेणार

नवी दिल्ली: भारतात २०२३ मध्ये क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये दहा ऐवजी चौदा किंवा सोळा संघांना खेळवण्याबाबत आयसीसी विचार करत आहे. लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. याआधी २००३, २०११ आणि २०१५च्या वर्ल्डकपमध्ये चौदा संघ खेळले होते. मात्र २०१९च्या वर्ल्डकपमध्ये दहा संघांचाच समावेश होता. icc may include 14 or 16 teams in cricket world cup

आयसीसीने २०१९च्या वर्ल्डकपमध्ये दहा संघांचाच समावेश केल्यामुळे टीव्ही माध्यमांनी नाराजी व्यक्त केली होती. मर्यादीत सामन्यांमुळे व्यावसायिक उत्पन्नावर परिणाम होत असल्यामुळे वर्ल्डकपमध्ये जास्त संघांना खेळवावे अशी टीव्ही माध्यमांची आग्रही मागणी आहे. या मागणीचा आयसीसी गंभीरपणे विचार करत आहे. 

क्रिकेटच्या प्रसारासाठी जास्तीत जास्त संघांचा वर्ल्डकपमध्ये समावेश करण्याबाबत आयसीसीचे अधिकारी गंभीरपणे विचार करत आहेत. आयसीसी २०२३, २०२७ आणि २०३१मध्ये होणार असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये चौदा किंवा सोळा संघांना खेळवण्याबाबत विचार करत आहे. जो निर्णय होईल तो २०२३, २०२७ आणि २०३१मध्ये होणार असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपसाठी लागू होणार असल्याचे वृत्त आहे.

क्रिकेट वर्ल्डकपची सुरुवात १९७५ पासून झाली. दर चार वर्षांनी आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन करते. क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००७ आणि २०१५ हे पाच वर्ल्डकप जिंकले. वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ तर भारताने १९८३ आणि २०११मध्ये वर्ल्डकप जिंकले. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करुन स्पर्धा जिंकली होती. इंग्लंडने २०१९मध्ये पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्डकप जिंकला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी