ICC ODI Ranking वन डे रँकिंगमध्ये विराट कोहली नंबर वन

ICC ODI Ranking virat kohli on top आयसीसी वन डे रँकिंग जाहीर. विराट कोहली वन डे फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी, रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर

ICC ODI Ranking virat kohli rohit sharma jasprit bumrah on top
ICC ODI Ranking वन डे रँकिंगमध्ये विराट कोहली नंबर वन 

नवी दिल्ली: आयसीसी वन डे रँकिंग (ICC ODI Ranking) जाहीर झाले आहे. भारताचा (India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli ) वन डे फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी आहे. उपकर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) वन डे फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. वन डे गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रित बुमराह (jasprit bumrah) दुसऱ्या स्थानावर आहे. ( ICC ODI Ranking virat kohli rohit sharma jasprit bumrah on top)

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल पाच जणांमध्ये भारताचा एकही खेळाडू नाही

वन डे खेळणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल पाच जणांमध्ये भारताचा एकही खेळाडू नाही. मात्र वन डे टीम रँकिंगमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसरे स्थान राखले आहे. या यादीत इंग्लंड अव्वलस्थानी आहे.

आयसीसी वन डे रँकिंग जाहीर

मंगळवारी आयसीसीने रँकिंग जाहीर केले. यात ८७१ रेटिंग पॉइंटसह विराट कोहली वन डे फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान राखण्यात यशस्वी झाला. तर उपकर्णधार रोहित शर्मा  ८५५ रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ८२९ रेटिंग पॉइंटसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

वन डे गोलंदाजांच्या यादीत भारताचा बुमराह ७१९ रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत ७२२ रेटिंग पॉइंटसह न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट अव्वलस्थानी आहे. यादीत तिसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा मुजीब उर रेहमान आहे. त्याचे ७०१ रेटिंग पॉइंट आहेत. 

वन डे क्रिकेटमधील अव्वल दहा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आठव्या स्थानावर आहे.  अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अष्टपैलूंच्या यादीत अव्वलस्थानी आहे तर इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानवर आहे. 

इंग्लंडच्या फलंदाजांना रँकिंग सुधारण्याची संधी

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात ३ वन डे मॅचची स्पर्धा होणार आहे. या निमित्ताने इंग्लंडच्या फलंदाजांना त्यांचे रँकिंग सुधारण्याची मोठी संधी मिळणार आहे. सध्या इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय अकराव्या आणि यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो चौदाव्या स्थानावर आहे. या आधी जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांचे सर्वोत्तम रँकिंग नऊ होते. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन वन डे फलंदाजांच्या यादीत २३व्या स्थानावर आहे.

क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता आयर्लंडला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जास्तीत जास्त चांगली कामगिरी करावी लागेल. आयर्लंड मर्यादीत सामने खेळत असल्यामुळे त्यांच्यासाठी कामगिरी सुधारण्याची उत्तम संधी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. 

आयसीसी वन डे रँकिंग

फलंदाज

 1. विराट कोहली
 2. रोहित शर्मा
 3. बाबर आझम
 4. रॉस टेलर
 5. जॉनी बेयरस्टो

गोलंदाज

 1. ट्रेंट बोल्ट
 2. जसप्रित बुमराह
 3. मुजीब उर रहमान
 4. पॅट कमिन्स
 5. कगिसो रबाडा

अष्टपैलू

 1. मोहम्मद नबी
 2. बेन स्टोक्स
 3. इमाद वसीम
 4. कोलिन डी ग्रँडहोम
 5. ख्रिस वोक्स

टीम

 1. इंग्लंड (England)
 2. भारत (India)
 3. न्यूझीलंड (New Zealand)
 4. दक्षिण आफ्रिका (South Africa)
 5. ऑस्ट्रेलिया (Australia)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी