ICC ODI Rankings: वर्ल्डकपनंतर वनडे रँकिंगची घोषणा, भारतीय खेळाडूंचा दबदबा

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 15, 2019 | 23:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ICC Oneday rankings, Virat Kohli, Jasprit Bumrah:वर्ल्डकप संपल्यानंतर आयसीसीने नुकतीच वनडे रँकिंग जाहीर केली आहे. पाहा कोणता फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर अव्वल स्थानी आहेत.

team india
टीम इंडिया  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • वर्ल्डकपनंतर आयसीसीने जाहीर केली वनडे रँकिंग
  • आयसीसीच्या रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा
  • फलंदाजांच्या रँकिंगमध्ये विराट,रोहित अव्वल

लंडन : भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी जाहीर केलेल्या आयसीसीच्या नव्या फलंदाजी आणि गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारतीय संघ आयसीसी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर झाला होता. रविवारी लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंडच्या खेळाडूंना रँकिंगमध्ये फायदा झाला. या रँकिंगमध्ये सेमीफायनल आणि फायनलमध्ये झालेल्या कामगिरीलाही समाविष्ट करण्यात आले. 

फलंदाजांची रँकिंग

फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या दोन स्थानावर कोहली आणि रोहित शर्मा आहेत तर गोलंदाजांमध्ये पहिल्या १० मध्ये एकमेव भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ दी टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणाऱ्या केन विल्यमसन्सने सेमीफायनलमध्ये करिअरमधील सर्वोत्कृष्ट ७९९ रेटिंग गुण मिळवले. फायनलमंतर त्याच्या नावावर ७९६ अंक आहेत तर रॉस टेरलनंतर सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स करिअरमधील सर्वोत्कृष्ट ६९४ गुणांसह रँकिंगमध्ये २०व्या स्थानावर पोहोचला आहे. 

संघाचा सलामीचा फलंदाज जेसन रॉयल सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६५ चेंडूत ८५ धावा करताना पहिल्या १०मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. फलंदाजांच्या रँकिंगध्ये रवींद्र जडेजाचे स्थान २४व्या गुणांनी सुधारले. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ७७ धावांची खेळी केल्याने तो १०८व्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि विकेटकीपर अॅलेक्स कॅरी अनुक्रमे २९व्या आणि ३२व्या स्थानावर आहेत. 

गोलंदाजांची रँकिंग

गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये ख्रिस वोक्स सर्वोत्कृष्ट ६७६ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. वर्ल्डकप स्पर्धेत २० विकेट मिळवणारा जोफ्रा आर्चर पहिल्यांदा ३०मध्ये पोहोचला आहे. सेमीफायनल आणि फायनलमध्ये दमदार कामगिरी करणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री पुन्हा एकदा अंतिम १०मध्ये पोहोचला आहे. ॉ

ऑलराऊंडर्सची रँकिंग

बांगलादेशचा शाकीब अल हसन ऑलराऊंडर्सच्या रँकिंगमध्ये करिअरमधील सर्वोत्कृष्ट ३१९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. टीम रँकिंगमध्ये इंग्लंडने वर्ल्डकप जिंकलयानंतर भारताहून तीन गुणांनी आघाडी घेतली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
ICC ODI Rankings: वर्ल्डकपनंतर वनडे रँकिंगची घोषणा, भारतीय खेळाडूंचा दबदबा Description: ICC Oneday rankings, Virat Kohli, Jasprit Bumrah:वर्ल्डकप संपल्यानंतर आयसीसीने नुकतीच वनडे रँकिंग जाहीर केली आहे. पाहा कोणता फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर अव्वल स्थानी आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...