आयसीसीच्या निर्णयामुळे भारत तिसऱ्या स्थानावर

ICC Ranking टेस्ट आणि टी-ट्वेंटी या प्रकारांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर वन डे रँकिंगमध्ये इंग्लंड पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

ICC Ranking_India_Cricket
आयसीसीच्या निर्णयामुळे भारत तिसऱ्या स्थानावर 

थोडं पण कामाचं

 • आयसीसीच्या निर्णयामुळे भारत तिसऱ्या स्थानावर
 • टेस्ट रँकिंगच्या नियमांमध्ये बदल
 • वन डे आणि टी ट्वेंटीच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल नाही

मुंबईः वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू असताना कोरोना संकट आल्यामुळे आयसीसीने टेस्ट रँकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. मात्र वन डे आणि टी ट्वेंटीच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आयसीसीच्या या निर्णयामुळे टेस्ट आणि टी-ट्वेंटी या प्रकारांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर वन डे रँकिंगमध्ये इंग्लंड पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया वन डे रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. (ICC Ranking)

कोरोना संकटामुळे रद्द झालेल्या टेस्ट सिरिज ड्रॉ झाल्या असे समजून या सिरिज खेळणाऱ्या दोन्ही टीमना समसमान गुणांचे वाटप केले जाईल, असा निर्णय आयसीसीने घेतला. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाच्या गुणांमध्ये वाढ झाली. ताज्या स्थितीनुसार टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया ११६ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड ११५ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत ११४ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड १०६ रेटिंगसह चौथ्या आणि श्रीलंका ९१ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. 

वन डे क्रिकेटमध्ये १२३ रेटिंगसह इंग्लंड पहिल्या तर ११९ रेटिंगसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड ११६ रेटिंगसह तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया १०९ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका १०८ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये २७५ रेटिंगसह ऑस्ट्रेलिया पहिल्या तर २७१ रेटिंगसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भारत २६६ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान १६२ रेटिंगसह चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका २५८ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी मॅच होतील. यानंतर दोन्ही टीम चार टेस्टच्या निमित्ताने एकमेकांविरोधात मैदानात असतील. दोन्ही टीम अतिशय तुल्यबळ आहेत. अशा परिस्थितीत स्पर्धा आणखी रंगतदार होईल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.

मॅचची इंग्रजीतील कॉमेंट्री (समालोचन) सोनी टेन वन (SONY TEN 1 channel) येथे उपलब्ध आहे. तसेच मॅचची हिंदी कॉमेंट्री सोनी टेन थ्री (SONY TEN 3 channel) येथे उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त इंग्रजी तामीळ आणि तेलुगु भाषेतील कॉमेंट्री सोनी सिक्स (SONY SIX channel) येथे उपलब्ध आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

 वन डे

 1. पहिली वन डे - २७ नोव्हेंबर, सिडनी
 2. दुसरी वन डे - २९ नोव्हेंबर, सिडनी
 3. तिसरी वन डे - १ डिसेंबर, कॅनबेरा

टी ट्वेंटी

 1. पहिली टी ट्वेंटी - ४ डिसेंबर, कॅनबेरा
 2. दुसरी टी ट्वेंटी - ६ डिसेंबर, सिडनी
 3. तिसरी टी ट्वेंटी - ८ डिसेंबर, सिडनी

टेस्ट

 1. पहिली टेस्ट - १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच), अॅडलेड
 2. दुसरी टेस्ट - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
 3. तिसरी टेस्ट - ७ ते ११ जानेवारी, सिडनी
 4. चौथी टेस्ट - १५ ते १९ जानेवारी, ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी ट्वेंटी भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (विकेटकीपर)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टेस्ट भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमान विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

दोन अतिरिक्त गोलंदाज भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जातील - कार्तिक त्यागी, इशान पोरेल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी