मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या इशान किशनला टी-20 क्रमवारीत ६८ स्थानांचा फायदा झाला असून तो ७व्या स्थानावर पोहोचला आहे. इशान पहिल्यांदाच T20 क्रमवारीत टॉप-10 मध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी ईशानचे रँकिंग ७६ होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांमध्ये इशानने फलंदाजी करत 164 धावा केल्या आहेत. (ICC T20 rankings: Ishaan kishan Beating 68 batsmen to reach top-10 for the first time)
अधिक वाचा :
IPL: बापरे! १ बॉलने तब्बल ४९लाखांची कमाई, IPLचे मीडिया राईट्सच्या विक्रीचा मोठा रेकॉर्ड्
भारतीय फलंदाज केएल राहुल दोन गुणांच्या नुकसानासह 14व्या स्थानावर घसरला आहे. श्रेयस अय्यर 16व्या, रोहित शर्मा 17व्या आणि विराट कोहली 21व्या स्थानावर आहे. केएल राहुलला दोन, रोहित शर्माला एक आणि विराट कोहलीला दोन स्थानांचा पराभव झाला आहे.
वनडेत पाकिस्तानचा दबदबा
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आता कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा दबदबा आहे. बाबर आझम हा पाकिस्तान संघाचा नंबर-1 कर्णधार आहे.
अधिक वाचा :
ENG VS NZ: टी-२० आहे की कसोटी? कर्णधार बेन स्टोक्सने लावली आग, पाहा व्हिडिओ
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत धमाकेदार कामगिरी करणारा इमाम-उल-हक नंबर-2 वर पोहोचला आहे. त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहली दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाचे 2 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. रोहित शर्मा 754 रेटिंग गुणांसह 8व्या तर विराट कोहली 742 रेटिंग गुणांसह 10व्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या ताज्या आकडेवारीत भारतीय गोलंदाजांनाही फायदा झाला आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत 11व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी तो 18 व्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर युजवेंद्र चहलच्याही चार गुणांची वाढ झाली असून तो या यादीत २६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड हा टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोत्तम गोलंदाज आहे.
अधिक वाचा :
नीरज चोप्राने ८९.३० मीटर अंतर भाला फेकत मोडला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी वनडे क्रमवारीतही पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने हे स्थान गाठले. जागतिक क्रमवारीत भारत आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान 102 वरून 106 अंकांवर गेला आहे. तो पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारताचे १०५ गुण आहेत. टीम इंडिया बऱ्याच दिवसांपासून एकदिवसीय मालिका खेळत नाहीये. ती चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ अव्वल, तर इंग्लंड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची वनडे मालिका खेळली होती.