ICC T20 World Cup 2022: टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा; २३ ऑक्टोबरला भारत काढणार पाकिस्तानचा वचपा?

ICC T20 World Cup 2022 schedule | आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तानला स्पर्धेच्या ग्रुप २ मध्ये एकसाथ ठेवण्यात आले आहे आणि यासोबत या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या संघाना जागा मिळाली आहे.

ICC T20 World Cup 2022 Announcement of T20 World Cup schedule India vs Pakistan match will on October 23
टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत आणि पाकिस्तान स्पर्धेच्या ग्रुप बी मध्ये आहेत.
  • भारत आणि पाकिस्तानचा बहुचर्चित सामना २३ ऑक्टोबरला होईल.
  • १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे स्पर्धेचा फायनल सामना खेळवला जाईल.

ICC T20 World Cup 2022 schedule | नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ (ICC T20 World Cup 2022) च्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तानला स्पर्धेच्या ग्रुप २ मध्ये एकसाथ ठेवण्यात आले आहे आणि यासोबत या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि बांगलादेशच्या (Bangladesh) संघाना जागा मिळाली आहे. भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (India vs pakistan) यांच्यामधील ऐतिहासिक सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) खेळवला जाईल. दरम्यान या बहुचर्चित टुर्नामेंटच्या सुरूवातीच्या ६ दिवशी म्हणजेच १६ ते २१ ऑक्टोबर पर्यंत टुर्नामेंटच्या पहिल्या फेरीतील सामने खेळवले जातील. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ टप्प्यातील सामने खेळवले जातील. (ICC T20 World Cup 2022 Announcement of T20 World Cup schedule India vs Pakistan match will on October 23). 

१६ ऑक्टोबरपासून आठव्या टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. स्पर्धेचे सामने ॲडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी खेळवले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना (Final Match) १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. सुपर-१२ फेरी दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांना ग्रुप १ मध्ये स्थान मिळाले आहे. तर भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांना ग्रुप २ मध्ये स्थान मिळाले आहे.

प्रत्येक ग्रुपमध्ये आणखी दोन संघाचा समावेश होईल. म्हणजेच चार संघांना सुपर १२ मध्ये प्रवेश मिळेल, जो पहिल्या फेरीतील त्यांच्या चांगल्या कामगिरीवर आधारित असेल. तसेच सुपर १२ चा पहिला सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून ४५ सामने खेळवले जाणार आहेत.

भारताचे टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक

टी-२० विश्वचषकात भारताला ग्रुप-२ मध्ये ठेवण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये भारतासोबतच पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी ग्रुप १ च्या उपविजेत्या संघाशी खेळणार आहे. यानंतर ३० ऑक्टोबरला भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारत २ नोव्हेंबरला ॲडलेडच्या ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल. शेवटच्या टप्प्यात भारतीय संघ ६ नोव्हेंबर रोजी एमसीजी येथे ग्रुप बी मधील विजेत्या संघाशी सामना करेल. 

केव्हा होणार फायनल

टी-२० विश्वचषक २०२२ चा उपांत्यफेरीचा सामना ९ आणि १० नोव्हेंबरला खेळवला जाईल. तर १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे स्पर्धेचा फायनल सामना खेळवला जाईल. 

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचे सामने 

भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, २३ ऑक्टोबर

भारत विरुद्ध ग्रुप ए उपविजेता, सिडनी क्रिकेट ग्राउंड, २७ ऑक्टोबर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ स्टेडियम, ३० ऑक्टोबर

भारत विरुद्ध बांगलादेश, ॲडलेड ओव्हल, २ नोव्हेंबर

भारत विरुद्ध ग्रुप बी उपविजेता संघ, मेलबर्न, ०६ नोव्हेंबर

दरम्यान, २०२१ च्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलियाने करायचे होते परंतु कोविड-१९ साथीच्या आजारामुळे स्पर्धेचा २०२० चा हंगाम रद्द झाल्यामुळे त्यांनी भारतासोबत अदला-बदली केली होती. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) पुन्हा २०२१ टी-२० विश्वचषक संयुक्तअरब अमिरात (UAE) आयोजित केला तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागच्या वेळी पुढे ढकललेला टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये पुन्हा आयोजित केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी