ICC T20 World Cup 2022 : आयसीसीची मोठी घोषणा! या दिवशी जाहीर होणार T20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 15, 2022 | 10:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC T20 World Cup 2022 Schedule | आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. १६ ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना (Final Match) १३ नोव्हेंबरला होणार आहे.

ICC T20 World Cup 2022 The ICC's big announcement world cup schedule fixtures date release will be on January 21 2022
विश्वचषकाचे या दिवशी जाहीर होणार संपूर्ण वेळापत्रक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणार आहे.
  • टी-२० विश्वचषक २०२२ चा थरार १६ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान होईल.
  • ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषक २०२१ चा किताब पटकावला होता.

ICC T20 World Cup 2022 Schedule | नवी दिल्ली : आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. १६ ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना (Final Match) १३ नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक सामन्यांची वेळ, तारीख याबाबतची अधिकृत माहिती (T20 Cricket World Cup Schedule Release Date) आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (ICC) तर्फे देण्यात आली आहे. सोबतच स्पर्धेच्या स्वरूपातील संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. (ICC T20 World Cup 2022 The ICC's big announcement world cup schedule fixtures date release will be on January 21 2022). 

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये किती संघ सहभागी होणार?

टी-२० विश्वचषक २०२२ चे आयोजन १६ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर यादरम्यान करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होतील. 

संपूर्ण वेळापत्रक शुक्रवारी होणार जाहीर 

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा शुक्रवारी २१ जानेवारी २०२२ ला केली जाणार आहे. यामध्ये कोणत्या संघामध्ये कधी सामने होतील, कोणत्या ग्रुपमध्ये कोणता संघ असेल. हे स्पष्ट केले जाईल. सोबतच सामन्यांच्या वेळेची देखील माहिती दिली जाईल. 

गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेचा प्रबळ दावेदार

ऑस्ट्रलेयामध्ये ही टुर्नामेंट २०२० जुलै मध्ये होणार होती. परंतु कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्याच्या कारणास्तव याला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर गतवर्षी भारताने टी-२० विश्वचषकाचे यजमानपद सांभाळले मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला (BCCI) ही स्पर्धा यूएईमध्ये करावी लागली. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषक २०२१ चा किताब पटकावला होता. आता यजमान कागांरूचा संघ आपला किताब कायम राखण्यासाठी डिफेंडर चॅम्पियन म्हणून स्पर्धेत (Cricket World Cup 2022) सहभागी होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी