ICC Test Rankings: स्मिथ-कोहलीमध्ये क्रमांक १ साठी युद्ध, इतक्या अंकाचे अंतर 

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जबरदस्त उडी घेतली आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सध्याच्या टेस्ट सिरीजमध्ये आतापर्यंत १४ विकेट घेतल्या आहेत. 

icc test ranking virat kohli is just one point behind steve smith ravichandran ashwin jumps to seventh spot news in marathi google batmya
स्मिथ-कोहलीमध्ये क्रमांक १ साठी युद्ध, इतक्या अंकाचे अंतर   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • अश्विनने तिसऱ्या स्थानांची उडी घेऊन सातव्या स्थानावर पोचला आहे
  • विराट कोहलीच्या खात्यात ३७ अंकाची वाढ झाली आहे, आता तो केवळ एक अंक मागे आहे. 
  • आयसीसीच्या टेस्ट टीम रँकिंगमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.

दुबई :  टीम इंडियाचा प्रमुख ऑफ स्पिनर स्पिनर रविचंद्रन अश्विन याने आयसीसीच्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये मोठी उडी घेतली आहे. अश्विनने या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपला पहिला सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टेस्ट सिरीजमध्ये धमाकेदार कामगिरी करणआऱ्या अश्विनने आयसीसी टेस्ट गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये तीन स्थानांनी उडी घेतली आहे. आता तो सातव्या स्थानावर पोहचला आहे. अश्विनने विशाखापट्टणमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्टमध्ये ८ आणि पुण्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये ६ विकेट पटकावल्या. 

३१ वर्षाच्या अश्विन तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज बनला आहे. त्याने सिरीजमध्ये आतापर्यंत १४ विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर रवींद्र जडेजा १० विकेटमुळे आहे. तर तिसऱ्या स्थानावर मोहम्मद शम हा ८ विकेट घेतल्या आहेत. 

टीम इंडियाने पुणे टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि १३७ धावांनी मात करून सिरीजमध्ये २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. सिरीजचा तिसरा आणि अंतीम मॅच १९ ऑक्टोबरला रांचीमध्ये खेळण्यात येणार आहे.  

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या टेस्टमध्ये आपल्या करिअरची सर्वोत्कृष्ठ खेली करत नाबाद २५४ धावा केल्या. त्यामुळे आयसीसी टेस्ट फलंदाजाच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटविण्यासाठी स्टीव स्मिथपेक्षा खूप कमी अंतर केले आहे. कोहलीने या खेळीमुळे ३७ अंक मिळविले आहेत. त्याचे रेटिंग ९३६ अंक झाले आहेत. तर स्टीव स्मिथला ९३७ अंक आहेत. त्यामुळे दोघांमध्ये १ अंकाचा फरक आहे. विराटच्या चाहत्यांना आशा आहे की, अखेरच्या कसोटीत कोहली आणखी एक खेळी करून स्मिथला मागे टाकेल. 

दक्षिण आफ्रिकाचा जलद गती गोलंदाज वर्नोन फिलँडर याला तीन स्थानांचे नुकसान झाले. तो सध्याच्या भारत दौऱ्यात केवळ दोन विकेट घेण्यात यशस्वी झाला आहे. आता तो अश्विननंतर आठव्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलद गती गोलंदाज पॅट कमिन्स अजूनही आयसीसी टेस्ट गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज कगिसो रबाडा आणि भारताचा जसप्रित बुमराह क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. 

ऑलराउंडर्सबाबत बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर अव्वल स्थानी आहे. भारताचा रविंद्र जडेजा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. 

टेस्ट टीम रँकिंगबाबत बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम अव्वल स्थानावर असून न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या इंग्लड चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानवर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी