ICC U-19 World Cup : बांगलादेशाच्या संघाला चीत करत टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत; पुढील लढत ऑस्ट्रेलियाशी

U-19 India Team Reach Semifinals:  भारताच्या युवा संघानं (India's team) U-19 विश्वचषकाच्या (World Cup) उपांत्य फेरीत (Semifinals) धडक मारली आहे. भारताने हे सामने सहजपणे जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं गतविजेत्या बांगलादेशचा (Bangladesh) पाच गडी राखत पराभव केला.

U-19 India Team Reach Semifinals
अंडर-19 टीम इंडियाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अव्वल संघ म्हणून भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली
  • अंगकृष रघुवंशी आणि उपकर्णधार शेख रशीद यांची 70 धावांची भागीदारी
  • बांगलादेशनं अवघं 112 धावांचं आव्हान दिलं होतं.

ICC U-19 World Cup India Reach to Semifinals:  भारताच्या युवा संघानं (India's team) U-19 विश्वचषकाच्या (World Cup) उपांत्य फेरीत (Semifinals) धडक मारली आहे. भारताने हे सामने सहजपणे जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं गतविजेत्या बांगलादेशचा (Bangladesh) पाच गडी राखत पराभव केला. या पराभवाने भारताने 2020 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतील बदला घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं अवघं 112 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव 111 धावात संपुष्टात आला. रवी कुमारने 3 आणि विकी ओस्तवालनं 2 फलंदाजाना माघारी धाडले. तर राजवर्धन हंगर्गेकर, कौशल तांबे आणि रघुवंशीनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

बांगलादेशने दिलेलं आव्हान भारतानं 31 व्या षटकातच पार केलं. मुंबईकर अंगरिक्ष रघुवंशीने 44 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान उपांत्य फेरीत भारताचा सामना येत्या बुधवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उपांत्यपूर्वी सामन्यात भारताचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. बलाढ्य पाकिस्तानचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघानं मोडून काढलं होतं. अशा स्थितीत उपांत्य फेरीचा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. 

रघुवंशीने उपयुक्त खेळी खेळली

112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आणि शून्य धावांवर हरनूर सिंहची विकेट गमावली. यानंतर अंगकृष रघुवंशी आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी 70 धावांची भागीदारी करत भारताचा मार्ग सुकर केला. रघुवंशीने 65 चेंडूंवर 7 चौकारांच्या मदतीनं 44 धावा आणि शेख रशीद यांनी 26 धावांची खेळी केली. मात्र, ही भागीदारी मोडून काढत बांगलादेशने विकेट घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला. अखेर भारताने 30.5 षटकांत 5 बाद 117 धावा करून सामना जिंकला. कौशल तांबेने शानदार षटकार ठोकत भारताला विजयाच्या दारात नेलं. बांगलादेशकडून रिपोन मोंडलने चार बळी घेतले. 

दरम्यान, भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी