आज रंगणार भारत-पाकमध्ये सेमीफायनलचा महामुकाबला

आज अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल रंगणार आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान टीम आमनेसामने असतील. अंडर-19 वर्ल्ड कप 2020चा हा पहिला सेमीफायनल सामना भारत-पाक यांच्यात खेळला जाणार आहे.

Ind Vs Pak
आज रंगणार भारत-पाकमध्ये सेमीफायनलचा महामुकाबला  |  फोटो सौजन्य: Facebook

पॉचेस्ट्रूम (दक्षिण आफ्रिका) : आज अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल रंगणार आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान टीम आमनेसामने असतील. अंडर-19 वर्ल्ड कप 2020चा हा पहिला सेमीफायनल सामना भारत-पाक यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं आतापर्यंत या वर्ल्डकपमध्ये अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात करून सलग तिसऱ्यांदा वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. 

प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम चार जणांमध्ये स्थान पटकावलं आहे. अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली लढत होणार आहे. 

टीम इंडियानं 2000 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा भारत चॅम्पियन बनला होता. यानंतर 2006 मध्ये उपविजेता, 2008 मध्ये विजेता, 2012 मध्ये विजेता, 2016 मध्ये उपविजेता आणि 2018 मध्ये विजेता बनला होता. दुसरीकडे पाकिस्तानची टीम पाच वेळा अंतिम फेरीत दाखल झाली. पाकिस्ताननं 2004 आणि 2006 मध्ये विजेतेपदावर नाव कोरलं होतं. तर 1988, 2010 आणि 2014 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने झाले आहेत. यातील 14 भारताने तर 8 पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.  तर बॉलिंगमध्ये रवि बिश्नोई चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत पाक 9 वेळा आमने सामने आले आहेत. यात 4 वेळा पाकिस्तान तर 5 वेळा टीम इंडियानं विजय मिळवला आहे. 

आज दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल. तर दुपारी 1 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्ट्रूम येथील सॅनवेस पार्क मैदानावर रंगणार आहे.  

अशा आहेत दोन्ही टीम

भारतीय U19 टीम: यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, विद्याधर पाटील, शुभांग हेगडे, तिलक वर्मा, प्रियम गर्ग, ध्रुव जुरेल, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, शाश्वत रावत, कुमार कुशाग्र, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रा, 

पाक‍िस्‍तान U19 टीम: हैदर अली, मोहम्मद हुरारा, रोहेल नजीर,  मोहम्मद वासिम ज्यूनिअर, अब्दुल बांगलजई, कासिम अकरम, मोहम्मद हैरिसव, इरफान खान, अब्बास अफरिदी, मोहम्मद शहजाद, आसिफ अली खान फहद मुनीर,  ताहिर हुसैन, आमिर अली, मोहम्मद आमिर खान

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...