लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले विरुष्का, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 19, 2019 | 14:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC Cricket World Cup 2019: इंग्लंडच्या धर्तीवर यंदाचा वर्ल्डकर २०१९ सुरू आहे.टीम इंडियातील अनेक खेळाडू आपल्या कुटुंबीयांसोबत दिसतायेत. विराट कोहलीसुद्धा पत्नी अनुष्कासोबत लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.

Virat Kohali and Anushka Sharma
विरुष्का फिरतायेत लंडनच्या रस्त्यांवर   |  फोटो सौजन्य: Instagram

लंडन: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा लंडनमध्ये पत्नी अनुष्‍का शर्माबरोबर फिरताना दिसला. टीम इंडिया सध्या आयसीसी वर्ल्डकप 2019 मध्ये छोट्याशा ब्रेकवर आहे. टीम इंडियानं रविवारी मॅनचेस्‍टरच्या ओल्‍ड ट्रॅफर्डमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्‍तानला सहज पराभूत केलं. विराट कोहलीच्या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाची पुढील मॅच साउथॅप्‍टनमध्ये शनिवारी अफगाणिस्‍तानसोबत होणार आहे.

विराट कोहली आणि अनुष्‍का शर्मा सध्या लंडनच्या गल्ल्यांमध्ये फिरत आहेत. विरुष्काचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. बहुतेक भारतीय खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबीय सध्या लंडनमध्येच त्यांच्याबरोबर आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनं (बीसीसीआई) भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्‍टाफच्या पत्नी आणि कुटुंबीयांना सध्या वर्ल्डकपमध्ये १५ दिवस बरोबर राहण्याची अनुमती दिलेली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@virat.kohli and @anushkasharma on the old bond street in London today ! I love Anushka's new haircut

A post shared by BleedKohlism2.0 (@bleedingkohlism) on

 

मात्र वर्ल्डकप २०१९ च्या सुरूवातीच्या २० दिवसांच्या कालावधीत, क्रिकेटर्संना पत्नी आणि कुटुंबीयांना एकत्र प्रवास करण्याची परवानगी दिलेली नव्हती. यामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज मॅचचाही समावेश होता. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननं स्वत:च्या आणि रोहित शर्माच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धवननं इंस्टाग्रामवर या फोटोबरोबर कॅप्शनही लिहिलंय, ज्यात 'शर्मा कुटुंबीयांबरोबर स्थानिक रेल्वे प्रवासाचा आनंद घेत आहे', असं म्हटलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Enjoying the local train journey with the Sharma family - @rohitsharma45 @ritssajdeh @aesha.dhawan5

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

 

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. या मॅचमध्ये रोहितनं दमदार बॅटिंग करत तब्बल १४० रन्स केले होते. टीम इंडियानं पाकिस्तानचा धुव्वा उडवत त्यांना ९८ रन्सनी पराभूत केलं. ही मॅच संपल्यानंतर रोहित शर्मानं आपले आभार मानले आणि सांगितलं त्यांच्याच मदतीमुळं वर्ल्डकप २०१९ मध्ये तो चांगलं प्रदर्शन करू शकतोय.

रोहिनं सांगितलं की, ‘मी आपल्या सर्वात उत्तम टप्प्यामध्ये आहे. हे सर्व माझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीमुळे घडतंय. मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे. आयपीएलमधील शानदार प्रदर्शनानंतर, वर्ल्डकप स्पर्धेत चांगली सुरुवात मिळाली आहे.’ 

टीम इंडियानं वर्ल्डकप २०१९ स्पर्धेत तीन मॅच जिंकल्या आहेत. तर एक मॅच अनिर्णित राहिली आहे. आता टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध लढा देण्यास सज्ज झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी