सोशल मीडिया सुसाट! धवनच्या जागी ‘या’ खेळाडूला बोलविण्याची मागणी

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 18:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ICC World Cup 2019: टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर पडलाय. त्यानंतर सोशल मीडियाची गाडी खूप सुसाट निघालीय. ‘या’ खेळाडूला टीममध्ये आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Shikhar Dhavan
शिखर धवनच्या दुखापतीनंतर सोशल मीडिया सुस्साट 

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरोधात वर्ल्डकपमध्ये दमदार सेंच्युरी ठोकणाऱ्या शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला वर्ल्डकपमधून बाहेर पडावं लागलंय. तब्बल २१ दिवस त्याला क्रिकेट खेळता येणार नाहीय. धवन टीमबाहेर जाताच टीम इंडियाला जबरदस्त धक्का बसलाय. कारण ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया चांगल्या स्थितीत दिसत होती. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. टीम मॅनेजमेंट समोर आता शिखर धवनच्या जागी कोण? हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यावर आता वेगवेगळे तर्क-वितर्क केले जात आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर शिखर धवनच्या वर्ल्डकप बाहेर जाण्याची बातमी आगीसारखी पसरलीय. अनेक क्रिकेटप्रेमींनी शिखर धवनच्या जागी टीममध्ये रिषभ पंतला घेण्याची मागणी केलीय. आयपीएलमध्ये रिषभनं दिल्ली कॅपिटल्सकडून मॅच खेळल्या होत्या. सोशल मीडियावर तर रिषभ पंतला टीममध्ये घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मागणी केली जातेय. सोशल मीडियावर रिषभ पंत म्हणजे टीममधील एक चांगला खेळाडू ठरू शकेल, असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. रिषभ पंत डावखुरा बॅट्समन आहे आणि तो सलामीचा खेळाडू म्हणून आपली भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं निभावू शकतो, असंही काही युजर्सचं म्हणणं आहे.

रिषभ पंतच्या बाबतीत सोशल मीडियावर खूप हालचाल दिसून येतेय. अनेक युजर्सच्या मते न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या मॅचमध्ये रोहित शर्मासोबत रिषभ पंतनं ओपनिंग करावी. तर अनेक जण रिषभ पंतबाबत मिम्स शेअर करताानाही दिसत आहेत.

पाहा सोशल मीडियावर कसा सुरू आहे धुमाकूळ...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शिखर धवन आणि रिषभ पंत दोघंही खूप चांगले मित्र आहेत. हे दोघंही दिल्लीतील रणजी टीमसाठी एकत्र खेळलेले आहेत. एवढंच नव्हे तर धवन आणि पंत यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स टीमकडून एकत्र खेळताना सगळ्यांनीच बघितलंय. अशातच बीसीसीआय सोशल मीडियावरील युजर्संना गंभीर घेतात की नाही हे बघणं औत्युक्याचं ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सोशल मीडिया सुसाट! धवनच्या जागी ‘या’ खेळाडूला बोलविण्याची मागणी Description: ICC World Cup 2019: टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर पडलाय. त्यानंतर सोशल मीडियाची गाडी खूप सुसाट निघालीय. ‘या’ खेळाडूला टीममध्ये आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola