IND vs NZ Practice Match: टीम इंडिया आणि न्यूझीलंड आज भिडणार!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 25, 2019 | 14:23 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IND vs NZ Warm-Up Match: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता लागला आहे. आता सर्व देशाचं लक्ष वर्ल्डकपकडे लागलंय. टीम इंडिया आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी सज्ज झालीय. आज टीम इंडिया आपली पहिली प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे.

Team India
टीम इंडियाची आज न्यूझीलंड विरोधात पहिली प्रॅक्टिस मॅच 

लंडन : क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ला आता सुरूवात होतेय. ३० मे पासून वर्ल्डकप मॅच सुरू होणार आहेत. त्यापूर्वी टीम इंडिया आता लंडनमध्ये दाखल झालीय. वर्ल्डकपसाठी टीम सज्ज असून आपली पहिली प्रॅक्टिस मॅच आज न्यूझीलंड विरोधात टीम इंडिया खेळणार आहे. या प्रॅक्टिस मॅचमधून तिथल्या परिस्थितीनुसार आपला खेळ बदलण्याचा प्रयत्न टीमच्या खेळाडूंचा असेल. केनिंगटन ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मॅचमध्ये टीम आपल्या मजबूत बॉलिंगसोबतच लोकेश राहुल आणि विजय शंकर यांच्या खेळावर विशेष लक्ष देईल. कारण या दोघांपैकी एक क्रिकेटपटू चौथ्या नंबरवर खेळू शकेल.

विराट कोहलीची ही टीम पुन्हा एकदा भारताला वर्ल्डकप मिळवून देण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. टीम इंडियानं आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप आपल्या नावावर केलाय. १९८३ मध्ये आणि २०११ साली भारतानं वर्ल्डकप जिंकला. वन-डे रॅंकिंगमध्ये सध्या टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडची टीम पहिल्या नंबरवर आहे. यंदा वर्ल्डकप इंग्लंडच्या धर्तीवरच खेळला जातोय. सोबतच गतविजेती ऑस्ट्रेलियाची टीमही वर्ल्डकपची एक प्रबळ दावेदार मानली जातेय.

आयसीसी वर्ल्डकप टुर्नामेंटमध्ये भारताची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरोधात साऊथम्पटनमध्ये होणार आहे. विरोधी टीमचं लक्ष टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर असेल. विराट वनडे सोबतच टेस्ट क्रिकेटमध्येही नंबर १  खेळाडू आहे. टीम इंडियामध्ये सलामीवीर खेळाडू म्हणून रोहित शर्मा आणि शिखर धवन नंतर तिसऱ्या नंबरवर विराट कोहली खेळायला येईल. जगातील सर्वात मजबूत टीम असलेल्या टीम इंडियाकडे अनुभव धोनी आहे. तर नवीन बॉलर्ससह टीम इंडिया सज्ज आहे. कुलदीप-चहलची स्पीनर जोडी भारतीय टीमसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

जाणून घ्या टीम इंडिया आणि न्यूझिलंड टीमच्या खेळाडूंबद्दल...

भारत : विराट कोहली (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, मोहम्मद शामी, विजय शंकर, रोहित शर्मा, कुलदीप यादव.

न्यूझीलँड : केन विलियमसन (कॅप्टन), टाम ब्लंडेल (विकेटकीपर), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लोकी फर्ग्‍यूसन, मार्टिन गप्टिल, मँट हेनरी, टॉम लँथम (विकेटकीपर), कॉलिन मुनरो, जिमी नीशम, हेनरी निकोल्स, मिचेल सँटनर, ईश सोढी, टिम साउदी, रॉस टेलर.

टीम इंडिया वि. न्यूझिलंड प्रॅक्टिस मॅच दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs NZ Practice Match: टीम इंडिया आणि न्यूझीलंड आज भिडणार! Description: IND vs NZ Warm-Up Match: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता लागला आहे. आता सर्व देशाचं लक्ष वर्ल्डकपकडे लागलंय. टीम इंडिया आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी सज्ज झालीय. आज टीम इंडिया आपली पहिली प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola