ENG vs AUS: लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा दणदणीत पराभव

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 25, 2019 | 23:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

England vs Australia, Cricket World Cup 2019: क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला.

England vs Australia
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया 

लंडन: विश्वचषक २०१९ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर २८६ धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ हा ४४.४ ओव्हरमध्ये २२१ धावाच करू शकला. यावेळी इंग्लंडकडून फक्त स्टोक्सनेच ८९ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे इंग्लंडला अतिशय महत्त्वाच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे इंग्लंडला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने कर्णधार फिंचच्या शतकी खेळीच्या जोरावर २८५ धावा केल्या होत्या. डावाच्या सुरुवातीलाच फिंच आणि वॉर्नर यांनी चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण तरीही त्यांनी इंग्लंडवर सहज विजय मिळवला. 

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडला सुरुवातीलाचा धक्के दिले. ज्या धक्क्यातून इंग्लंड शेवटपर्यंत सावरुच शकली नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेहरनडॉर्फ आणि स्टार्क यांनी अतिशय भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचं अक्षरश: कंबरडं मोडलं. बेहरनडॉर्फने १० ओव्हरमध्ये ४४ धावा देत तब्बल ५ विकेट्स घेतल्या. तर स्टार्कने ९ ओव्हरमध्ये ४३ धावा देत ४ बळी घेतले. त्यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडाली. 

दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचरण केलं होतं. यावेळी ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. पण शेवटच्या ओव्हर्समध्ये इंग्लिश गोलंदाजांनी अचूक मारा करत कांगारूना जखडून ठेवलं होतं. पण फिंचच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली होती. त्यामुळेच सामनावीर म्हणून देखील फिंचचीच निवड करण्यात आली. 

---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आज आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये आमनेसामने आला आहेते. दोन्ही संघ हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. इंग्लंडचं नेतृत्व इयॉन मॉर्गनकडे आहे तर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व हे अॅरॉन फिंचकडे आहे. दोन्ही संघाचा हा विश्वचषकातील सातवा सामना आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियने २८५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली होऊन देखील त्यांना फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २८५ धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा या सलामीवीर आणि कर्णधार अॅरॉन फिंच (१०० धावा) याने केल्या. याशिवाय डेव्हिड वॉर्नरने ५३ धावा केल्या. तर स्टिव्ह स्मिथ (३८ धावा),   उस्मान ख्वाजा (२३ धावा), ग्लेन मॅक्सवेल (१२), मार्कस स्टॉयनिस (८ धावा) आणि अॅलेक्स कैरी​ (३८ धावा) केल्या याशिवाय पॅट कमिन्सने फक्त १ धाव केली. तर मिशेल स्टार्क याने ४ धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलिया २८५ धावसंख्या उभारू शकली. इंग्लंडकडून क्रिस वॉक्सने दोन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, बेन स्टोक्स आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले. 

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यावेळी इंग्लंडने आपल्या संघात कोणतेही बदल केले नव्हते. तर ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने अॅडम झॅम्पा आणि नॅथन कूल्टर नाइल यांच्या जागी नॅथन लायन आणि जेसन बेहरनडॉर्फ यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

-------------

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील 32वी मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात ही मॅच होत आहे. इंग्लंड टीमचं नेत्रृत्व ईऑन मॉर्गन करत आहे तर ऑस्ट्रेलियन टीमचं नेत्रृत्व अॅरोन फिंच करत आहे. दोन्ही टीम्सची वर्ल्ड कपमधील ही सातवी मॅच आहे. गेल्या मॅचमध्ये श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

वर्ल्ड कप मधील दावेदार मानली जात असलेल्या इंग्लंडच्या टीमला सेमीफायनल गाठणं थोडं कठीण जात असल्याचं दिसत आहे. इंग्लंडच्या टीमला आता टॉप 4 टीम्समध्ये जागा मिळवण्यासाठी आपल्या तीन मॅचेसपैकी दोन मॅचेस जिंकाव्या लागणार आहेत. मात्र, ही वाट इंग्लंडसाठी तितकी सोपी नसणार आहे कारण, इंग्लंडच्या टीमला आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि टीम इंडिया सोबत मॅच खेळायची आहे. गेल्या 27 वर्षांत वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या टीमने ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध एकही मॅच जिंकलेली नाहीये.

इंग्लंडच्या टीमने सहा मॅचेसमध्ये आठ पॉईंट्स मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर, ऑस्ट्रेलियन टीमने चांगलं प्रदर्शन दाखवत 10 पॉईंट्स मिळवले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्टेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

 

LIVE हायलाईट्स

 

  1. ऑस्ट्रेलिया 10 ओव्हर्स 44 रन्स
  2. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 6 ओव्हर 26 रन्स
  3. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 1 ओव्हर 7 रन्स
  4. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर मैदानात
  5. ऑस्ट्रेलियन टीम बॅटिंगसाठी मैदानात
  6. इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकत घेतला प्रथम फिल्डिंगचा निर्णय
  7. इंग्लंडने टॉस जिंकला 

 

संभावित टीम:

ऑस्ट्रेलियन टीम: अॅरोन फिंच (कॅप्टन), जेसन बेहेरेंड्रॉफ, अॅलेक्स केरी, नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.

इंग्लंड टीम: ईऑन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल रशीद, मार्क वूड, लिआम प्लंकेट, जोप्रा आर्चर, जेम्स विन्स, लिआम डॉवसन, ख्रिस वोक्स, टॉम करन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ENG vs AUS: लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा दणदणीत पराभव Description: England vs Australia, Cricket World Cup 2019: क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola